बार्शी तालुक्यातील रणरागिणींनी दारू धंद्याच्या विरोधात पुकारला एल्गार ; खंडवी गावातील दारू धंदे केले उध्वस्थ
सोलापूर - बार्शी तालुक्यात अवैध दारू धंद्यांनी उन्माद मांडला असून यामुळे अनेकांचे संसार उध्वस्थ झाले आहेत.तालुक्यातील खंडवी येथील नागरिकांनी अवैध दारूधंदे बंद करा म्हणून वैराग पोलिस स्टेशनला निवेदने दिली.मात्र पोलिस दखल घेत नसल्याने येथील माहिलांनी दोन ठिकाणच्या अवैध दारूधंद्यावर मोर्चा न्हेवुन धंदे उध्वास्त केले आहेत.घटनेच्या सलग दुसऱ्या दिवशी येथील माहिलांनी अवैध दारू धंद्यावर आपला मोर्चा वळवत गावातील दारू धंदे उध्वास्त केले आहेत. दारू धंद्यवरील रसायन आणि दारू त्यांनी गटारीत आणि जमिनीवर ओतली आहे.दारू धंद्या वर कारवाई करण्यासाठी पोलिस असतात मात्र पोलिसांना कळवून देखील कारवाई न झाल्याने येथील महिला रणरागिणीना कायदा हातात घ्यावा लागला.स्वताकड़े गृहखाते असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तर यात लक्ष घालावे अशी मागणी या निमित्त होत आहे.यापुढे असे दारू धंदे सुरु राहिल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करून दारू धंदे उध्वस्त करू असा इशारा येथील माहिलांनी दिलाय.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





0 Comments