संत मुक्ताई पालखी सोहळ्याच सोलापूर जिल्ह्यात आगमन

पायी सहाशे किलोमीटर अंतर पूर्ण करत संत मुक्ताई पालखी सोहळ्याच सोलापूर जिल्ह्यात आगमन ; शेंद्रे ग्रामस्थ आणि प्रशासनच्या वतीने जल्लोशात स्वागत
संत परंपरेत अनन्य साधारण महत्व असलेल्या आणि महिला संत म्हणून एकमेव पालखी सोहळा असणाऱ्या संत मुक्ताईची पालखी सोहळा सहाशे किलोमीटरचा पायी प्रवास करून सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला. बार्शी तालुक्यातील शेंद्रे या गावी ग्रामस्थांच्या आणि प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याच स्वागत करण्यात आल.
संत निवृत्ती महाराज  , संत  न्यानदेव महाराज , संत सोपान काका , मुक्ताबाई , संत एकनाथ महाराज , संत नामदेव महाराज आणि संत तुकाराम महाराज या सात संतांच्या मांदीअळीत संत मुक्ताईला विशेष महत्त्व आहे.संत मुक्ताईचा पालखी सोहळा हा विधर्भ , मध्यप्रदेश , खानदेश आणि मराठवाड़ा या भागतुंन आणि जळगाव , बुलढाणा , जलना , बीड , उस्मानाबाद आणि सोलापूर या सहा जिल्हातून पंढरपुरला जातो. जवळपास 34 दिवस पायी चालत साडेसातशे किलोमीटर प्रवास पूर्ण केला जातो ही शेकडो वर्षाची परंपरा आहे. पंढरपुरमध्ये संत नामदेवराय हे या सोहळ्याला सामोरे येतात आणि संत मुक्ताई आणि संत नामदेवराय हे वाखरीला इतर संताना सामोरे जातात. आशा संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आज आगमन झाले असून 1 जुलै रोजी हा सोहळा पंढरपुर मध्ये पोहचणार आहे.अशी माहिती सोहळा प्रमुख मुक्ताई दिंडी सोहळा रविंद्र महाराज हारने यांनी दिली 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments