इंद्रायणी नदीच्या पुरात वाहून गेल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, अद्याप मृतदेह सापडला नाही


पुणे - आळंदी येथील इंद्रायणी नदीमध्ये वाहून गेल्याने एका चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. उदय शंकर लोंढे असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. उदय पुण्‍यातील कोथरुड येथील मोरे श्रमिक वसाहत येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, उदय लोंढे एका नातेवाईकाच्‍या विवाहासाठी सहकुटुंब आळंदीमध्ये आला होता. त्याचा मित्र देखील सोबत आला होता. आपल्‍या मित्रासोबत उदय इंद्रायणी नदीच्या घाटावर पूर पाहण्यासाठी गेले होते. उदयच्या मित्राला पाणी पाहून पोहण्याचा मोह आवरला नाही आणि त्‍याने थेट नदीत उडी घेतली. त्याला पाहून उदयला देखील मोह आवरला नाही आणि त्याने देखील नदीत उडी मारली. आज दिवस भर जोरदार पाऊस झाल्‍याने आळंदी मधील इंद्रायणी नदीला पूर आला होता, त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला होता. उदयला पोहता येत नसल्याने तो वाहून गेला.

नदीच्या बाहेर आल्यावर उदय बाहेर आला नसल्‍याची बाब मित्राच्या लक्ष्यात आली. त्‍याने या घटनेची माहिती उदयच्या आईला आणि नातेवाईकांना कळवली. त्‍यानंतर आई सुनीता शंकर लोंढे यांनी आळंदी पोलिसांना याविषयी माहिती दिली. पोलिसांनी तातडीने गावकऱ्यांसह उदयचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु उशिरा पर्यंत त्याचा मृतदेह सापडला नाही. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments