पुणे -मांजर हा तसा अनेकांच्या आवडीचा, लळा लावणारा प्राणी आहे. परंतु, आकसबुद्धीच्या व्यक्तीला या निरुपद्रवी प्राण्याची कीव कुठून येणार? पुण्यात एक असाच प्रकार घडला. शेजारच्या घरात गेलेल्या मांजरीला बाहेर फेकल्याचा जाब विचारल्याने शेजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. प्रभा मोहन रणपिसे (वय वर्षे 40, रा. म्हाळुंगे) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
असे आहे प्रकरण...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकुमार साळवे यांच्या घरात रात्रीचे जेवण सुरू होते. रणपिसे यांचे मांजर नेमके त्याच वेळी साळवेंच्या घरात घुसले. वर त्याने जेवणाऱ्यांच्या ताटात तोंडही घातले. यामुळे संतप्त झालेल्या साळवे कुटुंबीयांनी रागाच्या भरात मांजराला उचलून घराबाहेर फेकले. ज्यांची ही मांजर होती त्या शेजारी राहणाऱ्या प्रभा यांनी त्यांना याचा जाब विचारला.

आधीच्या भांडणात मांजरीने भर घातली...
खरेतर, रणपिसे आणि साळवे कुटुंबात आधीही कुरबुरी झाल्या होत्या. आता या नवीन प्रकरणाने त्यात तेल ओतले आणि वाद भडकला. पाहता पाहता वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. साळवे कुटुंबीयांनी प्रभा रणपिसे, त्यांची दोन मुलं आणि जावई या चौघांना बोलावून लाथाबुक्क्या, बांबू आणि पाइपने बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रभा रणपिसे या महिलेच्या डोक्यात जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या, तर त्यांचे जावई आणि दोन मुलंदेखील जखमी झाले. प्रभा यांना तातडीने औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी केली आरोपींना अटक
याप्रकरणी अमोल बालगुडे, गणेश ऊर्फ भय्या पाटील, आकाश मोंढे आणि राजीव साळवे यांना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

0 Comments