पंढरपूर- सध्या राज्यातच नव्हे तर देशात वीजेचा भयंकर प्रश्न भेडसावत आहे. याची जाण ठेवून स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रत्येक वेळी नव-नवीन उपक्रम हाती घेवून तो यशस्वी करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आता आणखी एक पावुल पुढे टाकत स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे याच्या संकल्पनेतून अपारंपरिक ऊर्जेचा (सौर उर्जा) वापर करून आपण स्वतःच स्वतःची वीज निर्मिती करू शकतो. हे ठरवून त्यांनी अभियांत्रिकीच्या मुख्य इमारतीवर वरील बाजूस व फार्मसीच्या इमारतीवर असे मिळून तब्बल २५० किलो वॅट सोलार ऑन ग्रीड रूफ टॉप सिस्टम तयार केले आहे. सदर प्रकल्प उभारताना सखोल अभ्यास करून त्याचे फायदे तोटे लक्षात घेवून सदर प्रकल्प पुणे येथील नामांकित स्पॅनपंप प्रायव्हेट लिमिटेड यांना करण्याची ऑर्डर दिली. या सोलर वीज निर्मिती प्रकल्पासाठी रु. एक कोटी ७० लाख रुपये इतका आला असून सदर प्रकल्पापासून प्रतिदिन १२५० एवढे युनिट्स वीज निर्मिती होते तर वार्षिक जवळ जवळ ४ लाख युनिट्स वीज निर्मिती या प्रकल्पापासून होऊ शकते. प्रकल्प महावितरण सोबत करार (नेट मीटरिंग) केला आहे. तसेच एवढ्या मोठ्या क्षमतेचा सोलार ऑन ग्रीड रूप टॉप सिस्टम हा मोठ्या विस्ताराचा राज्यातील एकमेव प्रकल्प आहे. महाविद्यालय हे प्रकल्पांच्या माध्यमातून विजेचा वापर करून शिल्लक राहिलेली वीज महावितरणला दिली जाते व सध्या स्वेरीला दिवसाकाठी संपूर्ण वीज पुरवठा सोलर उर्जेमार्फत होत आहे.
सदर प्रकल्प केल्याने स्वेरी दिवसा वापरणारी वीज महावितरण कडून न घेतल्याने सदर वीज महावितरण आवश्यक असणाऱ्या ग्रामीण भागांना देवू शकते. अशा प्रकारे स्वेरीने अप्रत्यक्षपणे शासनास मदत केली आहे. यावेळी डॉ. रोंगे म्हणाले कि, ‘सक्षम महाविद्यालयाने जर असे प्रकल्प केले तर ज्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वीजेचा तुटवडा भासत आहे अशांना काही प्रमाणात वीज तुटवड्यापासून मुक्ती मिळेल. सदर संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे नेहमीच विद्यार्थ्यांबाबतीत खूप काळजी घेत असल्याने वीज पुरवठा खंडित होवून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी सोलार प्रोजेक्ट बरोबरच किर्लोस्कर कंपनीचे ३२० के.व्ही.ए. क्षमतेचे जनरेटर खरेदी केली आहे. सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी तथा विद्युत पर्यवेक्षक संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रकल्प पूर्णत्वास आले आहे.यासाठी झालेला एक कोटी ७० लाख रुपयांचा खर्च हा साधारण साडेतीन ते ४ वर्षात परतावा होऊ शकतो या सौर ऊर्जेमुळे संस्थेचे लाईट बील पूर्वीपेक्षा जवळजवळ ४० ते ५० टक्केपर्यंत कमी आले आहे. या प्रकल्पासाठी महावितरण विभाग, विद्युत निरीक्षक विभाग व स्पॅन पंप या कंपनीचे सहकार्य लाभले.यावेळी विद्युत निरीक्षक विभागाचे अधीक्षक अभियंता एस.आर.नलवडे, महावितरणचे उपविभागीय अधिकारी मिसाळ, विद्युत अधिकारी रोटे,होनमाने, महावितरणचे अधिकारी वर्ग, अभियांत्रिकीचे उपप्राचार्य प्रा. एन.डी.मिसाळ, डिप्लोमाचे प्राचार्य प्रा. ए.डी.इंगळे, वसतिगृह अधीक्षक प्रा.एम.एम.पवार उपस्थित होते. सदर प्रकल्प ग्रामीण भागातील स्वेरीने उभारल्याने सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

छायाचित्र- स्वेरीच्या इमारतीच्या वरील बाजूस पसरलेला हा अथांग २५० किलो वॅट सोलार ऑन ग्रीड रूप टॉप सिस्टम सोबत संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, सोबत महावितरणचे प्रमुख अधिकारी विद्युत अधिकारी रोटे, होनमाने,स्वेरी अभियांत्रिकीचे उपप्राचार्य एन.डी.मिसाळ, डिप्लोमाचे प्राचार्य प्रा. ए.डी.इंगळे, वसतिगृह अधीक्षक प्रा. एम.एम.पवार, स्वेरीचे विद्युत पर्यवेक्षक संतोष जाधव व आदी.
From-
Shri. Santosh C. Halkude
Pandharpur - 413 304.
Mob: 9545 55 36 28,
Pandharpur - 413 304.
Mob: 9545 55 36 28,
9850 24 21 55 .
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111













0 Comments