सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखाना विरोधी तक्रारींवर सुनावणीस सुरुवात.


सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना विरोधात ad. दिपक पवार यानी गेल्या वर्षभरात विविध तक्रारी साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालक पुणे यांच्याकडे केलेल्या आहेत तसेच सर्व तक्रारींची चौकशी पुर्ण होइपर्यंत 
प्रशासक नेमावा त्याशिवाय योग्यरित्या चौकशी होणार नाही अशीदेखील मागणी करण्यात आलेली आहे.

साखर आयुक्तांच्या आदेशानुसार प्रादेशिक सहसंचालक पुणे यानी सर्व तक्रारी एकत्रित करुन त्यांच्या सुनावणीस सुरुवात केली असुन पुढील सुनावणी ७ /८/२०१७ रोजी नेमण्यात आलेली असुन ad.दिपक पवार यांना सुनावणी वेळी पुरावे सादर करण्या संदर्भात प्रादेशिक सहसंचालक यांनी सुचना केलेल्या आहेत.
    
कारखाना विरोधात वेगवेगळ्या विषयासंदर्भात   तक्रारी केलेल्या आहेत यात प्रामुख्याने 
१. सिताराम कारखान्यास अवैधपणे आर्थिक मदत करणे व सहकारी कारखान्यातील साहीत्य सिताराम कारखान्यास देणे.
२. सिताराम कारखाना उभारणीसाठी ज्या रकमा घेतल्या त्या शेतकऱ्यांना व्याजासह परत करणे.
३.सहकार शिरोमणी कारखाना लेखापरिक्षण अहवालानुसार ज्या अनियमितता आहेत त्यासंबंधी संचालक मंडळावर कारवाई करणे.
४.कारखान्यातील भंगार घोटाळा ज्यामध्ये भक्कम पुरावे आहेत त्याबाबत संचालक मंडळावर गुन्हे दाखल करणे.
५.सभासदांचा ऊस गाळप न करणे.
६.कमी केलेल्या सभासदाबाबत.
अशा विविध तक्रारी असुन या सर्वच तक्रारींबाबत 
एकत्रित सुनावणीस सुरुवात झालेची माहीती ad.दिपक पवार यांनी दिली.




  































































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Post a Comment

0 Comments