पंढरपूर: दि.३- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आषाढीवारी निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वारकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची दोन दिवस सोय करण्यात आली आहे. मा. प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव यांच्या मार्गदर्शनाने सुरु करण्यात आलेल्या पाणपोईचे उदघाटन माजी नगरसेवक मा. बाळासाहेब नेहतराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. जे. एस. पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे चेअरमन डॉ. राजाराम राठोड, कार्यक्रम अधिकारी डॉ. सौ. एफ. एस. विजापुरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. अमर कांबळे, प्रा. जी. बी. भगत, डॉ. भारत सुळे, डॉ. ए. एल. शेख, प्रा. सुहास शिंदे, प्रा. सागर शिवशरण, प्रा. कु.अलका घोडके, श्री. विक्रमसिंह कारंजकर, श्री.विकास कांबळे आदी मान्यवर सहभागी झाले.
यावेळी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेतर सेवक, राष्ट्रीय सेवा योजना, कमवा-शिका योजना यांचे विद्यार्थी बहुसंखेने पाणपोईची सेवा देण्यासाठी सहभागी झाले आहेत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!






0 Comments