रक्ताच्या उलट्या होऊन वारकऱ्याचा मृत्यु

करकंब:-
नेवासा जिल्हा नगर येथून आलेल्या दिंडीतील अशोक मुरलीधर कापसे वय 42 रा नागापुर ता नेवासा जि अहमदनर या वारकऱ्याचा रक्ताच्या उलट्या होऊन दि 2 रोजी रात्रीच्या सुमारास मृत्यु झाला असल्याची घटना करकंब येथे घडली.
याबाबतची फिर्याद दिंडीतील जयराम अनारसे रा भानसहिवरा ता नेवासा यांनी करकंब पोलिसात दिली आहे.
आषाढी यात्रेनिमित्त नेवासा येथून आलेली पायीदिंडी दि 2 रोजी करकंब येथील काटवटे वस्ती येथे मुक्कामी होती.दरम्यान रात्रीच्या सुमारास अशोक कापसे हे शौचासाठी जवळच असलेल्या आप्पासाहेब शेट्टी-पाटिल यांच्या ऊसाच्या शेतात गेले असता त्यांच्या रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यु झाला असल्याची घटना घडली आहे.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments