मुंबई : बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये स्टार्स आणि त्यांच्या मुलांच्या डेब्युची चर्चा जास्त रंगताना दिसतेय. प्रत्येक स्टार आपल्या मुला-मुलीला एका हटके प्रोजेक्टमधून बॉलीवुडमध्ये एन्ट्री करुन देतो. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुले हळूहळू इंडस्ट्रीत आपले पाय रोऊ पाहतात. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे या तरुण पिढीची उदाहरणे देता येतील जे लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करतील.
एका बाजूला स्टार्सची मुले आईवडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलीवूडमध्ये जाऊ पाहत आहेत पण अजय देवगन आणि काजोलची मुलगी न्यासाला यामध्ये अजिबात रस नाहीए.
एका ऑनलाईन वेब पोर्टलने दिलेल्या बातमीनुसार न्यासाला कधीच बॉलीवूडमध्ये जायचे नाहीए. कारण तिचे स्वप्न शेफ बनण्याचे आहे. काजोलने सांगतिले की तिच्या मुलीला खाद्यपदार्थ बनविण्याची आवड आहे. त्यामुळे सध्या ती शेफ बनण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
काजोल नुकतीच 'व्हीआयपी-२' या तामिळ सिनेमातून दिसली. यामध्ये तीने धनुषसोबत काम केले आहे. हीच फिल्म हिंदीमध्ये 'ललकार' नावाने रिलीज झाली. यामध्ये काजोलच्या अभिनयाची सगळीकडे चर्चा आणि कौतुक झाले. तसेच अजय देवगण लवकरच 'बादशाहो और गोलमाल अगेन' या सिनेमातून आपल्यासमोर येणार आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
0 Comments