पंढरीतील जुन्या कराड नाक्यावर भरधाव वेगातील कारची दुचाकीला धडक... युवती गंभीर जखमी.. पळून जाताना कारचालक महिलेला ला जमावाने पकडले..!!
पंढरपूर शहरातील जुना कराड नाका येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने दुचाकी ला धडक दिल्याने एक युवती गंभीर जखमी झाली आहे . पल्लवी सोनवणे (वय -२५ रा . मुळ जत जिल्हा सांगली सध्या पंढरपूर ) ही युवती गंभीर असुन येथील जनकल्याण हॉस्पिटल मध्ये तिच्यावर उपचार चालु असल्याचे समजते.
कारचालक प्रिया सोमाणी – भुतडा यांच्या कारचा वेग ईतका होता कि जवळपास ५० फुट दुरवर जखमी युवती जावुन पडली . रस्त्यावरील दुभाजकावर या युवतीचे डोके आपटले . घटनास्थळी असणाऱ्या लोकांनी जखमी ला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले . अपघातानंतर ” मी सोमाणीची मुलगी आहे ” असे सांगत कारचालक प्रिया सोमाणी ने पळ काढला. परंतु काही सामाजिक कार्यकर्त्यानी प्रिया सोमाणी यांचा पाठलाग करुन शहर पोलिस ठाण्यासमोर पकडले . पल्लवी सोनावणे या आय सी आय सी आय बॅंकेत कॅशियर असल्याचे समजते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
0 Comments