डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण...

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
  • पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 17  August 2017 


पंढरपूर (प्रतिनिधी):-मागील अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असणार्‍या डॉ.बाबासाहेब आंवेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण नगरपरिषदेच्या वतीने उदया दि. 18 ऑगस्ट ला दु. 4 वा. होणार आहे.
माजी नगराध्यक्ष सौ.उज्जवला भालेराव यांच्या कार्यकाळात नुतन चबुतर्‍याचे काम सुरु करण्यात आल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे स्थलांतर केले होते. नंतर राजर्षी शाहु विचार परिषदेच्या वतीने नवीन नऊ फुट पुतळा नगरपरिषदेला देण्यात आला. विद्यमान नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी चबुतर्‍याचे सुशोभीकरण पुर्ण केले होते. पण पुतळा बसविण्यास अडचणी येत होत्या. त्या दुर होऊन पुतळ्याचे अनावरण निश्‍चित झाले आहे.

या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले या असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुळचे जपानचे परंतु भारतीय नागरीकत्व असलेले व सध्या दीक्षाभुमी नागपूर येथे वास्तव्यास असलेले भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सामाजिक न्यायमंत्री ना.राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीपराव कांबळे, पालकमंत्री विजयसिंह देशमुख,आ.प्रशांत परिचारक, आ.भारत भालके, आ. रामहरी रुपनर, आ.दत्तात्रय सावंत, जि.प.अध्यक्ष संजय शिंदे, रिपाई राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे, पंढरपूर न.प. चे मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील, भाजप पक्ष नेता अनिल अभंगराव, उपनगराध्यक्ष सौ.सुजाता बडवे, नगरअभियंता दिनेश शास्त्री, पक्ष नेता पंढरपूर विकास आघाडी गुरुदास अभ्यंकर, विरोधी पक्ष नेता सुधीर धोत्रे, सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी सर्व संघटनेतील कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विश्‍वभुषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पंढरपूर यांनी केले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111







Post a Comment

0 Comments