जागतिक किर्तीचे बौद्ध धर्मगुरु भदन्त नागार्जुन सुरई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज होणार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे लोकार्पण

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
  • पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 18  August 2017 



पंढरपूरमध्ये आज 18 ऑगस्टला होणा-या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक लोकार्पण सोहळ्याला जागतिक किर्तीचे बौद्ध धर्मगुरु भदन्त नागार्जुन सुरई ससाई उपस्थित राहणार आहेत.

भदन्त नागार्जुन सुरई ससाई मांचा जन्म जपान मेथे झाला. त्यांनी आपले पुर्ण आयुष्म बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समर्पित केले. 1966 साली भदन्त सुरई ससाई भारतात आले. भारतातील बौद्ध धम्माच्मा ऐतिहासिक स्थळांचा त्यांनी भेट देऊन अभ्यास केला.
बौद्धगया स्थित महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे भदन्त सुरई ससाई हे प्रमुख शिलेदार आहेत. बौद्ध कालिन राजगृह व सध्याचे राजगीर मेथे विश्वशांती स्तुपाची निर्मिती जापनिज सरकारच्या सहकार्याने केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये केलेल्या बौद्ध धम्म क्रांती उदयाचा अभ्यास करता-करता भन्तेजींचा परिचय नागपूर मेथील बाबासाहेबांचे सहकारी मा.वामनराव गोडबोले त्यांच्याशी झाला. वामनराव गोडबोले मांनी भदन्त सुरई ससाई यांना भारतातील बौद्ध धम्म आणि आंबेडकरी चळवळीचा सखोल परिचय करुन दिला. त्यानंतर भन्तंजींने आपले पुर्ण जीवन नागपूर मेथील दिक्षा भूमी साठी समर्पित केले. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या बौद्ध धम्माच्मा प्रचार,प्रसारासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले.
भदन्त नागार्जुन सुरई ससाई सध्या नागपूर मेथिल दिक्षा भूमी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. पंढरीतील आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते सुनिल सर्वगोड व रिपाईच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव यांच्या आग्रहास्तव भन्तेजी येण्यास तयार झाले. पंढरपूराचे विठ्ठल मंदिर आणि बौद्ध धम्माचा असलेला ऐतिहासिक संदर्भ इत्यादी गोष्टींचा परिचय सुनिल सर्वगोड यांनी भदन्त सुरई ससाई यांना करुन दिला.

या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले या असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुळचे जपानचे परंतु भारतीय नागरीकत्व असलेले व सध्या दीक्षाभुमी नागपूर येथे वास्तव्यास असलेले भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सामाजिक न्यायमंत्री ना.राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीपराव कांबळे, पालकमंत्री विजयसिंह देशमुख,आ.प्रशांत परिचारक, आ.भारत भालके, आ. रामहरी रुपनर, आ.दत्तात्रय सावंत, जि.प.अध्यक्ष संजय शिंदे, रिपाई राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे, पंढरपूर न.प. चे मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील, भाजप पक्ष नेता अनिल अभंगराव, उपनगराध्यक्ष सौ.सुजाता बडवे, नगरअभियंता दिनेश शास्त्री, पक्ष नेता पंढरपूर विकास आघाडी गुरुदास अभ्यंकर, विरोधी पक्ष नेता सुधीर धोत्रे, सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी सर्व संघटनेतील कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विश्‍वभुषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पंढरपूर यांनी केले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




Post a Comment

0 Comments