“कर्मयोगी विद्यानिकेतन ची दहीहंडी ;यशोदा कृष्णाशी भांडी”

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व 
Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 16  August 2017 

आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसा निमीत्त विविध कार्यक्रम संपन्न
मंगळवेढा प्रतींनिधी :-श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचालित,कर्मयोगी विद्यानिकेतन पाटखळ या प्रशालेत आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसा निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये सर्वांचे लक्ष्य वेधून घेणारा घेणारा कार्यक्रम ठरला तो म्हणजे “दहीहंडी” सोहळा.    
     आपले “लहानगे कृष्ण ,लहानग्या राधा”यांना सोबत घेऊन सकाळी- सकाळी कर्मयोगी विद्यानिकेतन च्या प्रांगणात यशोदा माता हजर झाल्या.आणि सुरू झाला श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा यशोदा माता आपल्या लोणी चोर श्रीकृष्णा साठी पाळणे गाऊ लागल्या... काही माता आपल्या नटखट श्रीकृष्णाला आवरत- आवरत भक्तिमय वातावरणात मग्न दिसून येत होत्या.. काही कृष्णाचे साथीदार बाळ गोपाळ आणि राधिकाही यशोदा मातेकडे कृष्णाच्या तक्रारी सांगत होत्या... बाळ गोपाळ आणि गोपिकांच्या ही तक्रारी ऐकून यशोदा माता चिडलेली ...  आणि याचा जाब ती आपल्या कृष्णाला विचारतेय... अशातच प्रशालेच्या शिक्षिका सौ शिंदे यांनी असा कसा रे ...कृष्णा ”  हे गीत गायन केले. अशा या भक्तिमय वातावरणात दहीहंडी फोडण्यासाठी बाळ - गोपाळ यांचीही  चुरस लागते आहे. यशोदा माता रिंगण धरून गाणी म्हणत फेर धरत आहेत आणि या चैतन्यमय वातावरणात दहीहांडी फोडली जाते.....

          युटोपीयन शुगर्स परिसरात नव्यानेच निर्माण झालेल्या कर्मयोगी विद्यानिकेतन पाटखळ या प्रशालेच्या प्रथम वर्षीच भारतीय संस्कृती जोपासून विद्यार्थ्यांना बोलते करण्याबरोबरच त्यांना अशा उत्सवांची गोडी लागावी या करीता निर्माण केलेली वातावरण निर्मिती पाहून उपस्थित प्रमुख पाहुणे मंगळवेढा येथील शिर्के मॅटरनिटी होम च्या डॉक्टर सौ प्रीती शिर्के,व पालक चक्क भारावून गेले,सदर प्रसंगी पालकांच्या उपस्थितीत कृष्ण गीतांवर नाच करणार्‍या उत्कृष्ठ यशोदा माताउत्कृष्ठ राधा-कृष्ण व धावण्याच्या स्पर्धेतील विजेते यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते व युटोपीयन शुगर्स चे कार्यकारी संचालक मा. उत्तमराव पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत बक्षीस देऊन गौरविण्यात आले,
    या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनावर कार्यकारी संचालक मा. उत्तमराव पाटील यांचे विशेष लक्ष होते तर . प्रशालेच्या शिक्षकांनी खूपच कमी वेळात असे दर्जेदार विद्यार्थी तयार केले बद्दल पालकांनी शिक्षकांचे अभिनंदन केले . कार्यक्रमाच्या उपस्थिती बद्दल प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती काळुंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले..  
    फोटो ओळी :
1) आपल्या कृष्णाला रागावताना यशोदा माता
2) दहीहंडी फोडताना कृष्ण कन्हैया...

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



Post a Comment

0 Comments