न्याय व्यवहारात मराठीचा सक्षम वापर; अभ्यासगटाची स्थापना

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 22 August 2017 

    न्याय व्यवहारात मराठीचा सक्षम वापरअभ्यासगटाची स्थापना
    मुंबई, दि. 22 : न्याय व्यवहारात मराठीचा सक्षमपणे वापर करण्याच्या  कार्यपध्दतीचा अभ्यास करण्याकरिता अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे.
    या अभ्यासगटामध्ये विधी व न्याय विभागाच्या विधी-नि-प्रारुपकार आणि सह सचिव मंगला ठोंबरे,मराठी भाषा विभागाचे अवर सचिव आणि प्रभारी भाषा संचालक हर्षवर्धन जाधव आणि ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲड शांताराम दातार यांचा समावेश आहे.
    केंद्र आणि राज्य अधिनियमाच्या मराठी अनुवादाच्या विद्यमान कार्यपध्दतीचा अभ्यास करुन त्यातील त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने उपाय योजनांची आखणी करण्याकरिता शासनास शिफारस करणे,भाषा विकास योजनाकेंद्र आणि राज्य अधिनियम अनुवाद कार्यपध्दती यासंबंधी केरळकर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना भेटी देऊन तेथील कार्यपध्दतीचा तुलनात्मक अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करणेअन्य राज्यांमध्ये सुरु असलेल्या आदर्श कार्यपध्दतीचा  (Best Practices) अभ्यास करुन, या अभ्यासगटाने त्याबाबत अंमलबजावणीबाबत माहिती घ्यावी तसेच राजभाषेचा विकासत्याबाबतच्या योजना आणि न्यायालयीन व्यवहारात राजभाषेचा वापर याकरिता अन्य राज्यात असलेल्या विभागीय रचनेचा तुलनात्मक अभ्यास करणे, अशी या अभ्यासगटाची कार्यकक्षा असणार आहे.
    हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेताक 20170811857067033 असा आहे.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Post a Comment

    0 Comments