शोले' चित्रपटावेळी हेमाच्या प्रेमात धर्मेंद्र रोमँटीक सीन रिटेकसाठी द्यायचे पैसै.. बघा शोले चित्रपटासंदर्भातील रोमांचक किस्से आणि फोटो..!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व 
Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रि
य! 
पंढरपूर Live

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


पंढरपूर Live 16  August 2017



मुंबई- आजच्याच दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी 1975 रोजी 42 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर रमेश सिप्पी यांचा 'शोले' प्रदर्शित झाला होता. या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत बॉलिवूडच हीमॅन धर्मेंद्र आणि संजीव कुमार यांनीसुध्दा काम केले होते. सोबतच, अमजद खान यांची गब्बरची भूमिका आजसुध्दा लोकांच्या आठवणीत आहे.
रमेश सिप्पी यांच्या या सिनेमात नायिकेच्या भूमिका हेमा मालिनी आणि जया भादुरी यांनी साकारल्या होत्या. या सिनेमात कलाकारांनी केलेल्या अभिनयाची आजही आठवण काढली जाते. कदाचितच त्यामुळेच तरुण पिढीलासुध्दा हा सिनेमा पसंत पडतो.

'शोले' चित्रपटाच्या शूटिंगवेळी धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. चित्रपटात त्यांची नायिकाही हेमा मालिनी होत्या. त्यावेळी असे म्हणतात की, रोमँटीक सीनचे शूटिंग जेव्हाही सुरु होत असे तेव्हा धर्मेंद्र लाईट बॉयला सीन बिघडवण्यासाठी पैसे देत असत. 
जेणेकरुन त्यांना हेमासोबत जास्तीत जास्त वेळा रिटेक देऊन शूटिंग करायची संधी मिळत असे. या चित्रपटानंतर हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1979 साली लग्न केले.
70च्या दशकात देशभरात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या 'शोले' चित्रपटाचे हे Facts तुम्हाला नक्कीच माहीत नसतील..वाचा पुढच्या स्लाईडवर..


धर्मेंद्र यांनी सिनेमात 'वीरू'चे पात्र साकारले होते. परंतु त्यापूर्वी त्यांना 'ठाकूर बलदेव सिंह'चे पात्र साकारायचे होते. ठाकूर बलदेव सिंहची भूमिका संजीव कुमार यांनी साकारली होती. परंतु जेव्हा धर्मेंद्र यांना कळाले, की सिनेमाची नायिका वीरूला पसंत करते, त्यावेळी संजीव कुमार हेमामालिनीचे नायक बनू नये यासाठी त्यांनी तात्काळ निर्णय बदलला आणि वीरुची भूमिका साकारली.


हेमा मालिनी यांनी सिनेमात 'बसंती'चे पात्र साकारले होते. 'शोले'च्या शूटिंगच्या सुरुवातीला संजीव कुमार यांनी हेमा यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र हेमा यांना संजीव कुमार आवडत नव्हते. म्हणून हेमा यांनासुध्दा संजीव कुमार यांच्यासोबत सीन्स देण्यात कम्फर्टेबल वाटत नव्हते.


'शोले' सुपरहिट सिनेमा होता, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. या सिनेमाची लोकप्रियता आजही कायम आहे. मात्र पुरस्कारांच्या शर्यतीत हा सिनेमा मागे पडला होता. 'शोले' या सिनेमाला केवळ एकच फिल्मफेअर हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार एम.एस. शिंदे यांना बेस्ट एडिटिंगसाठी मिळाला होता.


42 वर्षांपूर्वी तयार झालेल्या या सिनेमाचे बजेट होते 3 कोटी रुपये. 1975 साली 3 कोटींची किंमत काय होती, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.
'शोले' सिनेमा रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांनी या सिनेमात विशेष रुची दाखवली नाही. मात्र हळूहळू या सिनेमाची लोकप्रियता वाढू लागली आणि तसतशी सिनेमाच्या कमाईतही भर पडली. प्रेक्षक मोठ्या संख्येने हा सिनेमा बघायला थिएटरकडे वळले. या सिनेमाची लोकप्रियात इतकी वाढली की पुढील पाच वर्षे हा सिनेमा मुंबईतील थिएटरमध्ये चालला.


सिनेमातील गब्बर सिंगची भूमिका अमजद खान यांनी साकारली होती. ही भूमिका आधी डॅनी डेनगोंजप्पा यांना ऑफर करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडे तारखा उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी ही भूमिका साकारली नाही. त्यानंतर ही भूमिका 70 च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीत प्रस्थापित होण्यासाठी संघर्ष करणारे अमजद खान यांना देण्यात आली.

असे म्हटले जाते, की जावेद अख्तर गब्बरच्या भूमिकेसाठी अमजद खान यांना कास्ट करण्याबाबत सहमत नव्हते. जावेद अख्तर यांना अमजद खान यांचा आवाज गब्बरच्या भूमिकेसाठी योग्य वाटत नव्हता. त्यामुळे अमजद खान यांना गब्बरची भूमिका देण्यासाठी त्यांनी सहमती दिली नव्हती. मात्र अखेर ही भूमिका त्यांनाच देण्यात आली आणि अमजद खान यांनी साकारलेला गब्बर प्रचंड लोकप्रिय ठरला.


सिनेमात जया बच्चन यांनी ठाकुरच्या विधवा सूनेची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या शूटिंगवेळी जया बच्चन प्रेग्नेंट होत्या. त्यांना पहिली मुलगी झाली होती. तिचे नाव श्वेता आहे. त्यानंतर 'शोले' सिनेमाचा प्रीमिअरवेळी सुद्धा जया बच्चन दुस-यांदा प्रेग्नेंट राहिल्या होत्या. त्यावेळी अभिषेक बच्चन त्यांच्या पोटात होता.


'शोले' सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या शूटिंगवेळी बंदुकीतील ख-या गोळ्या वापरण्यात आल्या होत्या. या शूटिंगशी निगडीत लोक सांगतात की, अमिताभ बच्चन यांना एक गोळी लागणार होती. मात्र ते यातून थोडक्यात बचावले होते.


बंगळूरुमध्ये जिथे सिनेमाचा क्लायमॅक्स चित्रीत करण्यात होता, त्या जागेचे नाव रामनगरम होते. मात्र नंतर रामनगरममधील एका भागाचे नाव बदलून सिप्पीनगर ठेवण्यात आले होते. असे सिनेमाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या सन्मानार्थ करण्यात आले होते.


17 एप्रिल 2015 साली रिलीजच्या तब्बल 40 वर्षानंतर हा चित्रपट पाकिस्तानात प्रथमच प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचे प्रीमीअर कराची येथे ठेवण्यात आले होते.



सिनेमाच्या शेवटी ठाकूर बलदेव सिंह गब्बर सिंहला जीवे मारतो. मात्र सेंसॉर बोर्डाने दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना सिनेमाचा अखेर बदलण्यास सांगितला. सिनेमात ठाकूर बलदेव सिंहने कायदा आपल्या हातात घेऊ नये, असे सेंसॉर बोर्डाचे मत होते. त्यामुळे सिनेमाचा शेवट बदलण्यात आला होता. मात्र शेवट बदलल्यामुळे दिग्दर्शक रमेश सिप्पी नाखुश होते.


'शोले' सिनेमात अभिनेता सचिन यांनी अहमद नावाच्या मुलाची भूमिका साकारली होती. या सिनेमाचे मानधन म्हणून सचिन यांनी एक फ्रिज घेतला होता.


चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले तेव्हा अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाला केवळ चार महिने झाले होते आणि पहिल्या बाळासाठी जया प्रेग्नेंट होत्या. तर या चित्रपटाच्या प्रीमीअरवेळी त्या दुसऱ्यांदा प्रेग्नेंट होत्या.

'ये दोस्ती हम नही तोडेंगे' या लोकप्रिय गाण्याचे चित्रीकरणासाठी २१ दिवसांचा कालावधी लागला होता.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



Post a Comment

0 Comments