प्रतीक्षा पावसाची... राज्यात पुन्हा सुरू होणार रिमझीम..!हवामान खात्याचे संकेत

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व 
Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 16  August 2017 

पंढरीच्या चंद्रभागा वाळवंट परिसरातील हे छायाचित्र टिपलंय पंढरपूरचा तरूण छायाचित्रकार धनराज  कडलाख  याने

पुणे – राज्याला गेल्या पंधरा दिवसांपासून ओढ दिलेला पाऊस गुरुवारपासून पुन्हा सक्रीय होईल. येत्या १८  ते २२ ऑगस्ट दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात चांगला पाऊस होणार आहे, असे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले आहे.
मान्सून सक्रीय होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. पश्चिम बंगाल आणि बंगालच्या उपसागरात वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्तिथी निर्माण झाली आहे. या बदलामुळे पावसाचा जोर वाढेल. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोव्यामध्ये येत्या १८ ते २२ ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडेल, असे हवामान खात्याने सांगितले. येत्या दोन दिवसात विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



Post a Comment

0 Comments