कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा पुणे वेधशाळेचा इशारा ..!!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
  • पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 19  August 2017 

पुणे : प्रतिनिधी
राज्यातील काही भागात पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवार दि. 20 रोजी कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर शनिवारी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
राज्यातील काही ठिकाणी हवेचा दाब कमी होत आहे. त्यामुळे शनिवारी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. रविवारी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर सोमवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दरम्यान, अरबी समुद्र व कोकणच्या काही भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्याच्या काही भागात, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस शुक्रवारी पडला आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये काही प्रमुख शहरांमध्ये पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये : खेड 40 मि.मी., कणकवली 30 मि.मी., दौडामार्ग, हर्णे, मंडणगड प्रत्येकी 20 मि.मी., आजरा, गगनबावडा, राधानगरी प्रत्येकी 10 मि.मी., मराठवाडा ः धारूर, लातूर, रेणापूर प्रत्येकी 10 मि.मी., अंबोणे 40 मि.मी., कोयना (पोफळी) 20 मि.मी., लोणावळा (ऑफिस), शिरगाव, वाणगाव, दावडी, कोयना, ताम्हिणी प्रत्येकी 10 मि.मी.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments