सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
मुख्य संपादक- भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
- पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 19 August 2017
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, ही अटकळ आता लवकरच खरी ठरणार असल्याची शक्यता ‘माझा’च्या सूत्रांकडून समजते आहे.27 ऑगस्टला अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावेळी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाती आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
काँग्रेसी वातावरणाला कंटाळलेल्या आणि नितेश तसंच निलेश राणेंच्या राजकीय भवितव्याची तरतूद म्हणून राणेंसाठी भाजप हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं सध्या बोललं जात आहे.
अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावेळीच राणेंचा पक्षप्रवेश होणार?
सुत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश लांबला आहे. त्यामुळे येत्या 27 ऑगस्टला अमित शाह यांच्या उपस्थितीत राणेंचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. तसेच राणेंचा पक्षप्रवेश लांबण्याची इतरही काही कारणं होती. राणे भाजपमध्ये आल्यास त्याचा भाजपला किती फायदा होईल याचीही चाचपणी भाजपकडून गेले काही दिवस सुरु होती.
…म्हणून आशिष शेलारांचा दिल्ली दौरा?
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी आशिष शेलार दिल्लीत गेले होते त्यामागे राणेंचा भाजप प्रवेश हेच प्रमुख कारण असल्याचं समजतं आहे. राणेंमुळे भाजपला कोकणात काय फायदा होईल याचीही चर्चा शाहा आणि शेलार यांच्यात चर्चा झाल्याचं समजतं आहे.
नारायण राणे केंद्रात जाणार?
दुसरीकडे राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की. भाजप प्रवेशानंतर नारायण राणे यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे राणेंना आता राज्यातील नव्हे तर केंद्रातील राजकारणात रस असल्याचं म्हटलं जात आहे.
राणे भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच आहे : चंद्रकांत पाटील
दरम्यान, कालच (शुक्रवार) महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘नारायण राणे भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच आहे.’ असं सूचक वक्तव्य केलं होतं. नारायण राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवस सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.
नारायण राणेंची अहमदाबादवारी
काही दिवसांपूर्वीच नारायण राणेंची अहमदाबादमध्ये अमित शाह यांची भेट झाली होती. तेव्हा राणेंच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चाही झाली होती. मात्र, आपण अमित शाह यांना भेटलोच नसल्याचं त्यावेळी राणेंनी म्हटलं होतं.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




0 Comments