अंकुश गाजरे यांना "म.भा.भोसले" साहित्य पुरस्कार प्रदान

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 25 september  2017 

   
पंढरपूर प्रतिनिधी
       शेळवे (ता.पंढरपूर) येथील साहित्यिक अंकुश गाजरे यांना श्री.समर्थ साहित्य,कला,क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळ,पलूस यांच्या वतीने देण्यात येणारा "म.भा.भोसले" साहित्य पुरस्कार पलूस येथे परिवर्तन साहित्य संमेलनात जेष्ठ गझलकार ए.के.शेख यांचे शुभहस्ते देवून गौरविण्यात आले. रोख रक्कम,मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते. हा पुरस्कार लेखक अंकुश गाजरे यांच्या "गावमातीतली माणसं" या पुस्तकाला जाहीर झाला होता.
      पुरस्कार वितरणावेळी व्यासपीठावर जेष्ठ विचारवंत डॉ.बाबुराव गुरव, जेष्ठ कवी ज्ञानेश्वर कोळी, कवी किरण शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना जेष्ठ गझलकार ए.के. शेख म्हणाले,ग्रामीण भागातील लिहिलेले लेखन हे कसदार आणि खरेखुरे असते.त्यातीलच हे "गावमातीतली माणसं " हे पुस्तक आहे.त्यात वास्तवता आहे.म्हणून त्या पुस्तकाचा आज सन्मान झाला आहे.
      लेखक अंकुश गाजरे यांची चार पुस्तके प्रकाशित आहेत. यापूर्वीही त्यांच्या पुस्तकांचा सन्मान झालेला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल लेखक अंकुश गाजरे यांचे अभिनंदन होत आहे


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments