मोहोळ येथील महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग

कार्तिकी वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व वारकरी बंधु-भगिणी व साधु-संताचे पंढरपूर लाईव्हच्या वतीने हार्दिक स्वागत..! 
विठ्ठल॥ विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥

पंढरपूर Live 31 October 2017

मोहोळ येथील महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग

मोहोळ(तालुका प्रतिनिधी)   

मोहोळ येथे तरुणीचा विनयभंग करून तिच्यासह त्या मुलीचा चुलता व चुलत भावास याबाबत का विचारणा केली म्हणून लाथा बुक्याने मारहाण केली असल्याची फिर्याद पीडित तरुणीने मोहोळ पोलिसात दाखल केली आहे.  

          याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ येथील देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय येथे दि २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान  राहुल पिंटू रसाळ व महेश स्वामी यांनी मोटार सायकल वरती येऊन पीडित महाविद्यालयीन तरुणीकडे पाहून हातवारे, इशारे करत चल असे म्हणून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याबाबत मुलीच्या चुलत्याने व चुलत भावाने त्याना विचारणा केली असता तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? असे म्हणत पीडित युवतीसह तिचा चुलता व चुलत भावास राहुल रसाळ, महेश स्वामी, अविनाश रसाळ यांनी मिळून शिवीगाळ व दमदाटी करून लाथा बुक्याने मारहाण केली अशी फिर्याद पीडित तरुणीने मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास सपोनि विष्णू गायकवाड हे करीत आहे.

 दामिणी पथकाने टवाळक्या करणारांना धडा शिकवावा!  - अॅड.विनोद कांबळे    (सामाजिक कार्यकर्ते)मोहोळ शहरातील शाळा व महाविद्यालयांत विद्यार्थिनींसाठी सुरक्षिततेचे वातावरण नाही. बाहेरून येणाऱ्या टवाळखोर मंडळींचा परिसरात धुमाकूळ सुरू असतो. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते एस टी स्टँड पर्यंत परिसरातील टोळक्यांकडून युवतींची छेडछाड केली जाते. त्यामुळे बाहेरगावच्या मुलींना तर आपला जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्यासाठी यावे लागते ही बाब लक्षात घेऊन दामिनी पथकाने अशा टवाळखोरांना धडा शिकविण्याची व कारवाई करण्याची गरज आहे.  - अॅड.विनोद कांबळे       (सामाजिक कार्यकर्ते)भीम युवा प्रतिष्ठान मोहोळ

पंढरपूर Live 31 October 2017

चिकुनगुन्या, डेंग्युपासून बचाव, हे फक्त तुमच्या सहकार्यानेच होऊ शकते..! 
पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर
नागरी हिवताप योजना मलेरिया विभाग
पंढरपूर शहरातील नागरिकांसाठी आवाहन
*चिकुनगुन्या, डेंग्यु आजार न होण्यासाठी घ्यावयाची काळजी*
चिकुनगुन्या, डेंग्युचा प्रसार स्वच्छ पाण्याच्या साठ्यामध्ये तयार होणार्‍या ‘एडिस इजिप्टी‘ डासापासून होतो म्हणून..... खालील प्रमाणे नागरिकांनी काळजी घ्यावी..! 
* घरामध्ये पाण्याचे साठे पाच दिवसापेक्षा जास्त दिवस करु नयेत. रोजच्या रोज भांडी स्वच्छ करुन, धुऊन भरावीत. 
* घरामध्ये असणार्‍या फ्रीज, एअर कुलर, प्लॉवर पॉट्स, पाण्याच्या टाक्या, कुंड्या, पत्र्याचे डबे, अथवा इतर वस्तु यामध्ये पाणी पाच दिवसापेक्षा जास्त काळ साठणार 
   नाही, याची काळजी घ्यावी. कारण यामध्ये चिकुन गुन्या, डेंग्युच्या डासांची पैदास होऊ शकते. 
* घराबाहेरील परिसरात असणार्‍या रिकामे शहाळे, फुटक्या बादल्या, नारळाच्या करवंट्या, रिकाम्या कुंड्या, रिकामे डबे, निकामी वाहनांचे टायर्स, खड्डे, इ. मध्ये 
   पावसाचे पाणी साठून त्यामध्ये चिकुनगुन्या, डेंग्युच्या डासांची पैदास होऊ शकते. यासाठी या वस्तुंची विल्हेवाट लावा. आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवा. 
* गच्चीवर असणार्‍या अथवा जमीनीवर असणार्‍या पाण्याच्या टाक्यांची झाकणे गच्च लावा. त्यामध्ये अजिबात फट ठेवू नका. अन्यथा त्यामध्ये डास जावून डासोत्पत्ती होईल.
* पाणी साठवण्याचे ड्रम, बॅरल इत्यादी दर दोन-तीन दिवसांनी धुवून स्वच्छ व कोरडे करावेत. 
* पाणी साठवण्याचे मोठे साठे, टाक्या असल्यास त्याची तपासणी आरोग्य कर्मचार्‍याद्वारे करुन घ्यावी.
* लक्षात ठेवा डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण न केल्यास डास निर्माण होणार नाहीत व त्यामुळे चिकुनगुन्या, डेंग्यु, मलेरिया आजार होणार नाहीत.
* सेप्टी टँकच्या व्हेट पाईपला वरच्या बाजुला नायलॉन जाळे बसवून घेणे. 
* रोज रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर जरुर करावा. 
 वरील प्रमाणे सर्व सुचनांचे पालन करुन दक्षता घेतल्यास चिकुनगुन्या, डेंग्यु तापाचा प्रसार आपल्या शहरामध्ये होणार नाही. 



नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन सौ.साधना नागेश भोसले (नगराध्यक्षा, नगरपरिषद पंढरपूर), श्री.अभिजीत बापट  (मुख्याधिकारी, नगरपरिषद पंढरपूर), सौ. सुजाता त्रिंबक बडवे (उपनगराध्यक्षा, नगरपरिषद पंढरपूर),  सौ. शिंदे भाग्यश्री देवेंद्र (सभापती, आरोग्य विभाग नगरपरिषद पंढरपूर), डॉ. श्री. एस. बी. गायकवाड (आरोग्य अधिकारी, नगरपरिषद पंढरपूर) व श्री. डी. एफ. गजाकोश (प्रभारी जीवशास्त्रज्ञ,ना.हिवताप योजना न.प.पंढरपूर ) यांनी केले आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments