महात्मा फुले सूतगिरणीच्या चेअरमनपदी पुष्पा कांबळे तर व्हाईस चेअरमनपदी मनिषा कांबळे यांची निवड

कार्तिकी वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व वारकरी बंधु-भगिणी व साधु-संताचे पंढरपूर लाईव्हच्या वतीने हार्दिक स्वागत..! 
विठ्ठल॥ विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥

पंढरपूर Live 1 November 2017
महात्मा फुले सूतगिरणीच्या चेअरमनपदी पुष्पा कांबळे तर व्हाईस चेअरमनपदी मनिषा कांबळे यांची निवड
मोहोळ(तालुका प्रतिनिधी)


वाघोली ता, मोहोळ येथील महात्मा फुले अनुसूचित जाती जमाती शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या चेअरमनपदी पुष्पा साहेबराव कांबळे यांची तर व्हाईस चेअरमनपदी मनीषा सुरेश कांबळे यांची काल दि ३१ रोजी बिनविरोध निवड झाली.                            

         माजी मंत्री व सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे कार्यरत असलेल्या या सूतगिरणीचे चेअरमन अभिजीत ढोबळे व व्हाईस चेअरमन गोविंद भोरकडे यांनी वैयक्तिक कारणामुळे या पदांचा राजीनामा दिला होता. या रिक्त पदासाठी आज सोलापूर वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपसंचालक किरण सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी या दोन्ही पदासाठी अनुक्रमे पुष्पा कांबळे व मनीषा कांबळे यांचेच एकमेव अर्ज आल्याने त्यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी किरण सोनवणे यांनी जाहीर केले. त्यांना वस्त्रोद्योग विभागातील अधिकारी परमेश्वर गदगे यांनी सहकार्य केले.                                          

            निवडीनंतर नूतन चेअरमन पुष्पा कांबळे यांचा मावळते चेअरमन अभिजीत ढोबळे यांनी तर व्हाईस चेअरमन मनीषा कांबळे यांचा माजी व्हाईस चेअरमन गोविंद भोरकडे यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. सध्या सर्वच सूतगिरण्याना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी आपण या दोन्ही  पदासाठी महिलांची निवड केली आहे. आमच्यावर जो विश्वास टाकून ही जबाबदारी दिली आहे त्याला पात्र राहून काम करू आणि सूतगिरणीच्या प्रगतीकडे अधिक लक्ष देऊ असे नूतन चेअरमन पुष्पा कांबळे व मनीषा कांबळे यांनी यावेळी सांगितले.                    


सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा असे सांगितले. तर संचालक मंडळातील सर्वांना संधी मिळावी यासाठी हा बदल करण्यात आला असल्याचे सांगत दर वर्षी नवीन पदाधिकारी निवडले जातील असेही सांगितले. दरम्यान शासनाकडे सूतगिरणीचा गारमेंटचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे असेही प्रा, ढोबळे म्हणाले. यावेळी सर्व संचालक अधिकारी- कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्तिकी वारीनिमित्त पंढरी दर्शनाची    13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments