कामावरचा ताणताणाव आणि मानसिक आरोग्य कार्यशाळा पंढरपुरात


पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 18 October 2017


 


कामावरचा ताणताणाव आणि मानसिक आरोग्य कार्यशाळा पंढरपुरात संपन्न झाली.

१५ ऑक्टोबर रविवारी सकाळी IMA HALL लिंक रोड येथे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाचे औचित्य साधून पंढरपुरातील मनोविकार तज्ञ डॉक्टर्स डॉ विनायक राऊत डॉ ऋजुता उत्पात डॉ तेजस भोपटकर आणि डॉ शेरॉन भोपटकर यांनी IMA पंढरपूर शाखेच्या वतीने हि कार्यशाळा आयोजित केली होती. 

विविध हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचारी तसेच विविध शाळांमधील शिक्षक यांच्यासाठी हि कार्यशाळा होती. IMA अध्यक्ष डॉ पंकज गायकवाड यांनी कार्यशाळेची सुरुवात करताना मानसिक आरोग्य उपक्रमांचे महत्व सांगितले.

 डॉ तेजस आणि डॉ शेरॉन भोपटकर यांनी मन; मनाचे कार्य; ताणतणाव म्हणजे काय ; त्यांचे प्रकार आणि लक्षणे यांची माहिती दिली. 
डॉ ऋजुता उत्पात यांनी वेगवेगळ्या लघुनाटीकांद्वारे कामाच्या ठिकाणी ताणताणाव कसा निर्माण होतो आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात हे सांगितले. 

त्यानंतर डॉ विनायक राऊत यांनी ताणतणाव नियोजन तसेच वेळेचे नियोजन याविषयी मार्गदर्शन केले.
 कार्यशाळेच्या अखेरीस कवठेकर प्रशाला नाथचौक  चे मुख्याध्यापक श्री एस पी कुलकर्णी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि याप्रकारच्या कार्यशाळा पुनःपुन्हा आयोजित कराव्यात अशी सूचना केली.
या कार्यशाळेसाठी डॉ. मंदार सोनवणे, डॉ. संजय कोरे, डॉ. होनमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments