पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करणार - नगराध्यक्ष साधनाताई भोसले



पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 17 October 2017



 


पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करणार -  नगराध्यक्ष साधनाताई भोसले
पंढरपूर शहारामध्ये स्टेशन रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असुन या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याबाबत वारंवार शहारातील काही सघटनाच्या वतीने मागणी करण्यात येत होती तसेच नगरसेवक संजय निंबाळकर,विशाल मलपे, नारायण शिगण यांनी नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांच्याशीसमक्ष चर्चा करुन पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यासाठी किमान नव्वद लाख चा निधी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केली होती. यावर नगराध्यक्ष यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे संपुर्ण महाराष्ट्रासह देशाचा स्वाभिमान असल्याने पुतळा सुशोभिकरण करण्यासाठी नगरपरिषदेने प्राथमिक स्वरुपात आराखडा केला असूनसध्या चाळीस लाख रुपयेची तरतुद केली आहे. व यासाठी योग्य त्या शासकियतांत्रिक मंजुरी घेण्यात आल्या आहेत. व या कामाच्या लवकरच निविदा मागवण्यात येत असून निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम सुरु करणार असून पुतळा सुशोभिकरणासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडु दिला जाणार नाही अशी माहिती नगराध्यक्ष यांनी दिली. या चर्चेच्या वेळी पक्षनेते अनिल अभंगराव, गुरु अभ्यकर,नगरसेवक विक्रम शिरसट,शकुंतला नडगिरे,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, बसवेश्वर देवमारे, नवनाथ रानगट हे उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments