पंढरपूर युवक कॉग्रेसच्या वतीने पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 13 October 2017

 


पंढरपूर युवक कॉग्रेसच्या वतीने पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त
नांदेड महापालीका निवडणूकीत कॉग्रेसचा दणदणीत विजय 
पंढरपूर युवक कॉग्रेसच्या वतीने पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त  

नोटबंदी,जीएसटी आणि शेतकरी हिताच्या विरोधातील शासन अशी प्रतिमा निर्माण झाल्याने राज्यात भारतीय जनता पक्षाला आपली लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असतानाच नांदेड महापालीका निवडणूकीत खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पक्षाने एकहाती सत्ता स्थापन करीत भाजपा,शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेसचा दारुण पराभव केला आहे.या निकालामुळे जनतेमध्ये पुन्हा कॉग्रेसची लोकप्रियता वाढत असल्याचे सिध्द झाले आहे.या विजयाचा आनंद पंढरपूर येथील युवक कॉग्रेस (आय)च्या वतीने पंढरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतषबाजी करुन साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना युवक कॉगे्रसचे शहराध्यक्ष शंकर सुरवसे म्हणाले की,भाजपा मुक्त भारताची सुरवात ही नांदेड महापालीका निवडणूकीपासून झाली असून देशात लवकरच गुजरात आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणूका होणार असून या निवडणूकीत जनता पुन्हा कॉग्रेेसच्या पाठीशी ठाम उभारणार आहे याचे संकेत या निकालवरुन मिळाले आहेत.सामान्य जनतेच्या अपेक्षांची पुर्तता फक्त कॉग्रेस शासनच करु शकते याचा जनतेला विश्‍वास पटला आहे.
   यावेळी कॉग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले,मा.अध्यक्ष सुहास भाळवणकर,प्रा.अशोक डोळ,अशपाक सय्यद.जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील,कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते मा.नगरसेवक माउली गवळी, शिवबुध्द प्रतिष्ठाणचे संस्थापक संदीप मुटकुळे,युवक मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुमीत शिंदे,सत्यम धुमाळ,वीर शेख,संदीप माने,शहाजी शिंदे,दिपक येळे,अक्षय साबळे,शिवबुध्द संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष सुधीर शिवशरण,निलेश कोरके आदी कॉग्रेसप्रेमी उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments