पंढरपुर येथील जुगार आड्डयावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमचा छापा..!
*2 लाख 26 हजाराच्या मुद्देमालासह 12 आरोपींना घेतले ताब्यात*
पंढरपूर Live 7 NOVEMBER 2017
-------------------------------------------------
सोलापूर पोलीस अधीक्षक श्री.विरेश प्रभू सर यांचेकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दि 06-11-2017 रोजी सायं 6-00 वा चे सुमारास पंढरपूर शहरातील आंबेडकर नगर येथील रूममध्ये चालत असलेल्या मन्ना नावाच्या जुगार आड्डयावर छापा टाकून आरोपी 1) प्रवीण विठ्ठल तोंडसे, 2) नवनाथ मधुकर सुडके, 3) सिताराम गंगाधर केसकर, 4) प्रकाश शंकर दुपारगुडे, 5) प्रमोद पशा मेहडा, 6) राजेंद्र तुकाराम सर्वगोड, 7) बशीर इब्राहिम बागवान, 8) संभाजी महादेव भोईटे, 9) विशाल गुलाब सर्वगोड, 10) हरी पंढरीनाथ लाळे, 11) शैलेंद्र नाना सावंत, 12) चारुदत्त भिमाशंकर बोळे सर्व रा पंढरपूर यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे 2,26,440/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व 12 आरोपी विरूद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभू सर यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील स.पो.नि संदीप धांडे, पो.हे.काँ अंकुश मोरे, पोना अमृत खेडकर, पोकाँ बाळराजे घाडगे, सुरेश लामजने, अनुप दळवी, सागर ढोरे पाटील, बालाजी नागरगोजे यांच्या टिमने हे काम केले आहे.*
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





0 Comments