चळे ता.पंढरपूर येथील मटका अाड्डयांवर मा. पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमचा छापा..! *85,800/-रू च्या मुद्देमालासह 03 आरोपींना घेतले ताब्यात*

चळे ता.पंढरपूर येथील मटका अाड्डयांवर मा. पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमचा छापा..!
*85,800/-रू च्या मुद्देमालासह 03 आरोपींना घेतले ताब्यात*
पंढरपूर Live 7 NOVEMBER 2017

----------------------------------------
   सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री.विरेश प्रभू सर यांचेकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पंढरपूर तालुका  पोलीस ठाणे हद्दीतील  चळे गावात पेट्रोलिंग करीत असताना दि 06-11-2017 रोजी संध्याकाळी  20 वा चे सुमारास महादेव  चौकातील छञपती टी सेंटर मध्ये तसेच समाज मंदीराजवळ  भिमनगर चौक येथे   चालत असलेल्या मटका अाड्डयांवर छापा टाकून आरोपी 1) अंबादास उर्फ अमर रामचंद्र गोवे  , वय 30 वर्षे, 2) तानाजी रामचंद्र गोवे , वय 26  वर्षे,3) दिंगबर किशन वाघमारे वय 36 वर्षे . सर्व रा.चळे ता. पंढरपूर हे इसम मटका घेत असताना मिळाल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे 85,800/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींना मटका बुक्की मालकाची नावे विचारता त्यांची नावे 4) कल्याण भोसले रा.सरकोली  व 5) महादेव शिंदे रा. आंबे ता.पंढरपूर अशी सांगितली. वरील सर्व आरोपी व बुक्की मालक यांचेविरूद्ध पंढरपूर तालुका  पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          *या प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभू सर यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील पोसई गणेश निंबाळकर, पो.हे.काॅ. मनोहर माने, पो.कॉ, श्रीकांत जवळगे, सोमनाथ बोराटे , विलास पारधी, अक्षय दळवी,पांडुरंग केंद्रे , विष्णू बडे  यांच्या  टिमने हे काम केले आहे.*
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments