70 लाख चोरी प्रकरणी पोलिसांना यश..! 70 लाखासह दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात!

70 लाख चोरी प्रकरणी पोलिसांना यश..! 
70 लाखासह दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात! 

पंढरपूर Live 2 November 2017
 बुधवारी दुपारी बँक ऑफ महाराष्ट्र सांगोला शाखेचे मॅनेजर आपल्या खासगी गाडीतून बँकेची 70 लाखाची रक्कम घेवून पंढरपूरकडे निघाले असताना त्यांची गाडी अडवून काही अज्ञात चोरट्यांनी 70 लाख पळवून नेल्याची फिर्याद बँक मॅनेजर भोसले यांनी पोलिसात दिली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी शीघ्र गतीने लावला असून 70 लाख रक्कमेसह दोन संशयीत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरीचा हा डाव बँक मॅनेजरनेच रचला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असुन त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. आज सायंकाळपर्यंत याबाबत सर्व तपास पुर्ण होऊन आरोपींची नावे समोर येतील.

काल बुधवारी दुपारी 1 वाजणेच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्र सांगोला शाखेचे मॅनेजर आमोल भोसले हे आपल्या खासगी कार (MH 45 N5831) बँकेची 70 लाख रूपयाची रक्कम घेवून पंढरपूरकडे येत असताना सांगोला पंढरपुर मार्गावर खर्डी जवळच्या जगताप मळ्यानजीक बोलेरो गाडीने त्यांच्या कारला पाठीमागून धडक दिली. भोसले व इतरांच्या डोळ्यात चटणी टाकली. गाडीच्या काचा फोडून त्यातील 70 लाखाची रक्कम घेवून चोरट्यांनी पोबारा केला. अशी माहिती भोसले यांनी आपल्या फिर्यादीत दिली होती. 

या घटनेची माहिती मिळताच याची गंभीर दखल घेत सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक विरेश प्रभु यांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच पंढरपूर शहर व तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. बोलेरो गाडीचा शोध सुरू केला. या गुन्ह्यातील तपासादरम्यान पोलिसांना अनेक संशयास्पद बाबी नजरेत आल्या. वेगवेगळ्या दृष्टीने तपास करत पोलिसांनी बोलेरो गाडीचा शोध लावला. ही गाडी मंगळवेढा हद्दीत आढळून आली. सदर गाडी, 70 लाखाची रक्कम व दोन संशयीत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकंदर पोलिसांचा तपास सकारात्मकरित्या चालू असून सायंकाळपर्यंत आरोपींची नावे समोर येतील.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments