संतोष अधटराव खुन प्रकरणाला कलाटणी ! पंढरपूर मधील धनंजय अधटराव व सोलापूर चा एकजण ताब्यात!

कार्तिकी वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व वारकरी बंधु-भगिणी व साधु-संताचे पंढरपूर लाईव्हच्या वतीने हार्दिक स्वागत..! 
विठ्ठल॥ विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥

संतोष अधटराव खुन प्रकरणात सामील होते अजून काहीजण ! पंढरपूर मधील धनंजय अधटराव व सोलापूर चा एकजण ताब्यात!
पंढरपूर Live 1 November 2017

मोहोळ(तालुका प्रतिनिधी)
संपूर्ण जिल्‍ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर येथील संतोष अधटराव या युवकाचा मोहोळ तालुक्यातील शेजबाभुळगाव शिवारात झालेल्या खून प्रकरणी तपासाने वेगळी दिशा घेतली असून यामध्ये आणखीन दोन आरोपी ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली असून याप्रकरणातील मूळ आरोपी संतोष कानोरे याला आज पुन्हा न्यायालयात उभे केले असता त्यास ३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ आक्टोबर रोजी आरोपी संतोष कानोरे यांनी आपला मित्र संतोष अधटराव यास मोहोळ तालुक्यातील शेजबाभुळगावच्या हद्दीत जमिनीच्या व्यवहाराचे खोटे कारण सांगून एम / एच १२ ए एफ ६४८३ या सॅनट्रो कारमधून आणून लघुशंकेच्या निमित्ताने गाडी उभी करून पाठीमागून उसाच्या कोयत्याने वार करून खून करून पळ काढला होता.

याबाबतचा गुन्हा मोहोळ पोलिसात दाखल होताच जिल्हा पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के सपोनि निलेश बडाख, पोलीस नाईक विलास रणदिवे, मुन्ना बाबर, विशाल गायकवाड, महेश कोळी, दत्तात्रय वाघमारे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संतोष कानोरे यास गाडीसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरचा खून व्याजाचे पैसे वेळोवेळी देऊन सुद्धा पुन्हा पैश्याची मागणी केली तसेच आपल्या पत्नीवर वाईट नजर ठेवली त्या रागामुळे आपण खून केला असल्याची कबुली त्याने दिली होती, कानोरे यास न्यायालयात उभे केले असता त्याला प्रारंभी पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती त्या काळात तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेले हत्यार, कानोरे याच्याकडून जप्त करण्यात आले होते


याबाबत पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवून अधिक तपास केला असता संतोष कानोरे याने या खुनामध्ये शंकर बिभीषण सुरेराव वय ३३ रा.लक्ष्मीपेठ दमाणीनगर सोलापूर व धनंजय वसंत अधटराव वय  ४५ रा. हनुमान मैदान पंढरपूर या दोघांचा या खुनाच्या कटामध्ये सहभाग असून खून करतेवेळी हे दोघे माझ्याबरोबर होते असे सांगितल्याने मोहोळ पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे दरम्यान आज पुन्हा कानोरे याला न्यायालयात हजर केले असता या प्रकरणातील तपासाची प्रगती पाहता पुन्हा ३ नोव्हेबर पर्यंत त्यास न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवून दिली आहे याबाबत अधिक तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे सपोनि निलेश बडाख हे करीत आहेत.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments