सातारा - जिल्ह्यातील म्हसवड पोलिस स्टेशनच्या हद्दीत खंडणी व खुनाच्या प्रयत्नांचे गुन्हे असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माणचे नेते शेखर गोरें आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर मोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्याच्या राजकिय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरकुटे मलवडी (ता. माण) येथे खंडणीसाठी गिरिराज रिन्युएबल्स कंपनीच्या जागेत घुसून जेसीबी मशिनच्या सहाय्याने बांधकाम पाडण्याची घटना बुधवार (दि.२५) ऑक्टोबरला घडली होती. या प्रकरणी शेखर गोरे यांच्यासह १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यात काही जणांना अटकही करण्यात आली होती.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, संशयित लोक खंडणीसाठी दहशत निर्माण करणे, दरोडा टाकून वाहने पळविणे, अशा प्रकारचे गुन्हे करून आर्थिक फायदा करून टोळी चालवत असल्याचे समोर आले. या प्रकारामुळे शेखर गोरे यांच्या टोळीविषयी परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यामुळेकोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या मान्यतेने अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार म्हसवडचे सहाय्यक निरिक्षक मालोजीराव देशमुख यांनी शेखर गोरे टोळी विरूध्द संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार (मोका) राष्ट्रवादीचे नेते शेखर भगवान गोरे (रा. बोराटवाड, ता. माण), नगरसेवक संग्राम अनिल शेटे (वय २३, रा. म्हसवड), सतीश आनंदा धडांबे (वय ३६), सागर शंकर जाधव (वय ३०, दोघे महिमानगड) यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
खंडणीसाठी दहशत निर्माण करून आर्थिक गुन्हेगारी जिल्ह्यात वाढू लागली आहे. याला आळा घालण्यासाठी अशा गुन्हेगारांवर मोका कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले होते. म्हसवड पोलिस स्टेशन हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर म्हसवड पोलिस स्टेशनचे सहायक निरिक्षक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पद्माकर घनवट लक्ष ठेऊन होते. या गुन्ह्याचा तपास दहिवडीचे पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

0 Comments