बाळासाहेबांच्या स्मारकासाठी पर्यावरणीय मान्यता अंतिम टप्प्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी पर्यावरणीय मान्यता अंतिम टप्प्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017
            मुंबईदि. 17 : दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे सर्वांसाठी स्फूर्ती देणारेप्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राच्या सामाजिकराजकीयसांस्कृतिक वाटचालीमध्ये त्यांनी ठसा उमटवला. सर्वांना प्रेरणा मिळेलअसे त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी सर्व त्या मान्यता दिल्या असून पर्यावरणीय मान्यता अंतिम टप्प्यात आहे. स्मारकाच्या निर्मितीमध्ये शासन आवश्यक ती सर्व मदत करेलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले

            महापौर बंगला येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेलोकसभेचे माजी अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाईपरिवहन मंत्री दिवाकर रावतेपर्यावरण मंत्री रामदास कदमशिक्षणमंत्री विनोद तावडेगृह राज्यमंत्री दीपक केसरकरजलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारेवस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकरमहापौर विश्वनाथ महाडेश्वरखासदार संजय राऊतचंद्रकांत खैरेविनायक राऊतआनंदराव अडसूळश्रीमती पुनम महाजनआमदार सुनील राऊतयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेरश्मी ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियातील सदस्य उपस्थित होते.
दिवंगत बाळासाहेबांनी समाजातील तळागाळातल्या माणसाला जागृत करुन त्याला नेतृत्व दिलेमोठे केलेअसे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेबाळासाहेबांनंतरही त्यांचे विचार कायम रुजावेतयासाठी त्यांच्या राष्ट्रीय स्मारकाची संकल्पना उभी राहिली. त्यांचे यथोचित असे स्मारक मुंबईत व्हावे अशी राज्यातील सर्व घटकांची इच्छा होती.  त्यानुसार महापौर बंगला येथे हे स्मारक उभे राहण्यासाठी सर्व प्रकारची मान्यता देण्यात आली आहे. आवश्यक तेथे कायद्यात बदल करण्यात आले. पर्यावरणाची मान्यता अंतिम टप्प्यात आहे. समाजाला प्रेरणा देणारे सुंदर असे त्यांचे स्मारक येथे उभारले जाणार आहे. स्मारकाची निर्मिती ट्रस्टच्या माध्यमातून होणार असली तरी राज्य शासन या स्मारकाच्या निर्मितीमध्ये आवश्यक ती सर्व मदत करेलअसेही ते म्हणाले.
             आजच्या डिजिटल युगात बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भात आणि त्यांच्या जीवनपटासंदर्भात सर्व गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी चांगले संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांचे विचार आणि ऊर्जा जनतेपर्यंत पोहोचेलअसा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला 2 कोटी रुपये
            यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे स्वत: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या लोकप्रतिनिधिंनी मानधनातून एकूण 2 कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीसाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्री. ठाकरे आणि शिवसेनेचे आभार मानले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वजण आहोत असा संदेश या माध्यमातून जाईलअसेही मुख्यमंत्री याप्रसंगी म्हणाले.

            बाळासाहेबांच्या मनात शेतकऱ्यांच्या विषयी प्रचंड संवेदना होती. हीच संवेदना जिवंत ठेऊन राज्य शासन शेतकऱ्याला संपूर्ण संकटातून बाहेर काढून शाश्वत शेतीकडे नेण्याचा संकल्प करत आहेअसेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments