चंद्रमौळी वसाहत मोहोळजवळ कार-ट्रकची समोरासमोर धडक; एका महिलेचा मृत्यू, ९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

चंद्रमौळी वसाहत मोहोळजवळ कार-ट्रकची समोरासमोर धडक; एका महिलेचा मृत्यू, ९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

पंढरपूर Live 6 November 2017

मोहोळ(दादासाहेब गायकवाड)

पुण्याहून सोलापूरकडे जाणारी इनोव्हा कार व सोलापूरहुन मुंबईकडे जाणारा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर ९ जण जखमी झाल्याची घटना काल मोहोळपासून दोन किलोमोटर अंतरावर चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीजवळ घडली. जखमींपैकी अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अफसनाबानू महंमद जावीद असे मृत महिलेचे नाव आहे.

         याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आंध्रप्रदेश येथून निघालेला ट्रक क्र टी.एन. ४६ एस. ७९४१ हा नाशिक कडे जात असता पुण्याहून सोलापूरकडे निघालेली इनोव्हा कार यांची चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीसमोर समोरासमोर धडक झाली. अपघातात अफसनाबानू महंमद जावीद (वय १८, रा. मोघलपूरा, चारमिनार, हैद्रराबाद) ही महिला जागीच ठार झाली. तर महंमद जाविद महंमद हुसेन (वय ४५) , अमीनाबानू महंमद इब्राहीम (वय १७), मुबिनाबानू महंमद इब्राहिम (वय ३५), महंमद बिलाल महंमद जाविद (वय २०), महंमद उसामा महंमद इब्राहिम (वय १४), अमीनाबानू महंमद इब्राहिम (वय १३), समाधरबानू महंमद जाविद (वय १२) , सबीकाबानू महंमद जाविद (वय ४०), सुहाबानू महंमद जाविद (वय ८) सर्व रा. मोघलपुराजवळ चारमिनार, हैदराबाद हे जखमी झाले. यामध्ये अमिनाबानू महंमद इब्राहिम यांच्यासह अन्य एकाची प्रकृती चिंताजनक आहे.


     अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सपोनी नागराज निंबाळे, पोलिस नाईक सुभाष गोरे, हरिदास आदलिंगे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमींना तातडीने सोलापूर येथे उपचारासाठी पाठवून दिले. याबाबत ट्रकचालक मन्नीवन रामन्ना (रा. तुरईकुडी, उमामहेश्वरपुरम, तामिळनाडू) याच्यावर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनी नागराज निंबाळे हे करीत आहेत. 
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments