राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून ऊस वाहतूक वाहनांना बसविले रिफ्लेक्टर


पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017

पंढरपूर: प्रतिनिधी
ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांमूळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ  सुरु आहे. यात रात्रीच्यावेळी पाठीमागून आलेल्या वाहनांना ऊसाचे ट्रॅक्टर दिसत नसल्याने अनेकवेळा अपघात घडले आहेत. याचाच विचार करुन ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक, यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने मोफत रिफ्लेक्टर बसविण्यात आले आहेत. यामूळे ऊस वाहतूक वाहन चालकातून समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्यात एक नोव्हेंबर पासून साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरु केला आहे. पंढरपूर तालूक्यातही ऊस गाळप हंगाम जोमात सुरु आहे. रस्त्यांवर रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करणारी वाहने धावत असताना दिसून येतात. विशेषत: ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या असल्यामूळे ट्रॅक्टर चालकाला पाठीमागून आलेल्या वाहनांचा अंदाज येत नाही. यात चालक मोठमोठ्या आवाजात लाऊड स्पिकर लावून वाहने चालवीत असल्याने समोरुन अथवा पाठीमागून येणार्‍या वाहनांना धोकादायक ठरत आहे. रात्रीच्या वेळी  पाठिमागून आलेल्या वाहनांना पुढे ऊसाचा ट्रॅक्टर आहे. हे केवळ न दिसल्याने अपघात होत आहेत. याचाच विचार करुन ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांमूळे अपघात होऊन नयेत. म्हणून वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले आहेत. या रिफ्लेक्टरमूळे अंधारातही समोर वाहन आहे. याची जाणीव चालकांना होणार असून अपघात होण्यापासून सावध होता येणार आहे.
याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, तालुकाध्यक्ष गणेश बनसोडे, शहराध्यक्ष संकेत घोगरदरे, जिल्हा सरचिटणीस फैजल इनामदार, रणजित पाटील,  जय देशमाने, सागर पडगळ, गजानन ननवरे, अमोल चव्हाण, गौस करमाळकर, प्रसाद आधटराव आदींसह कार्यकर्ते उपिस्थित होते.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments