पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 22 December 2017
सोलापूर दि. 22 :- जिल्ह्यात 24 डिसेंबर रोजी ग्राहक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमांत संबधित विभागानी कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या आयोजनासंदर्भात जिल्हा पुरवठा कार्यालयात सर्व संबधित विभागाचे अधिकारी आणि ग्राहक मंत्र्याचे सदस्य यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी श्री. पाटोळे श्री छत्रपती रंगभवन येथे दिनांक 24 डिसेंबर 2017 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री विजय देशमूख, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष प्रकाश जाधव उपस्थित राहणार असल्याचे श्री. पाटोळे यांनी सांगितले
यावर्षीचा राष्ट्रीय ग्राहक दिन एाशीसळपस ऊळसळींरश्र चरीज्ञशींी ; र्खीीीशी रपव उहरश्रश्ररसशी ळप उेर्पीीाशी झीेींशींळेप विषयावर साजरा करण्यात येणार आहे. ग्राहक दिन कार्यक्रमात वस्तू व सेवा कर याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे, श्री. पाटोळे यांनी सांगितले.
ग्राहक प्रबोधनार्थ शालेय विद्यार्थ्याची फेरी आयोजित करण्यात आली आहे. तसेच या दिवसी ग्राहकांसाठी संपूर्ण दिवसभर रंगभवन येथे विविध कार्यालयांमार्फत स्टॉल लावण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने वजनमापे, वस्तू व सेवाकर ,दूरसंचार विभाग, कृषी विभाग, आधार लिंक, नवीन आधार कार्ड काढणे, पोलिस विभाग, पुरवठा विभाग यासह सर्व संबंधित विभागांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. स्टॉलवर ग्राहकांचे प्रबोधनार्थ संबंधित विभागाकडून माहिती दिली जाणार आहे. ग्राहक दिन कार्यक्रमात व स्टॉलला जिल्ह्यातील नागरीकांनी भेट द्यावी, असे आवाहन ही श्री पाटोळे यांनी केले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





0 Comments