ज्या गोष्टीत अधिक रस आहे त्या गोष्टीचं शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावं-सुनिल बिडकर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर Live 28 December 2017


सांगोला (प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्याला ज्या गोष्टीत जास्त रस आहे, अशा गोष्टीचे शिक्षण घ्यावे. आयुष्यभर शिकण्यातच वेळ वाया घालवू नका. ज्याप्रमाणे जास्त डाटा भरल्यावर मोबाईल हॅंग होतो. त्याप्रमाणे बुद्धीही हॅंग होत असते. त्यामुळे आपल्या ध्येयाचे भान ठेवून शिक्षण घ्या, असे मत सुनिल बिडकर यांनी व्यक्त केले.

काल शनिवार दि. 23 डिसेंबर रोजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित माध्यमिक कन्या प्रशाला सांगोला येथे वार्षिक स्नेहसंमेलनानिमीत्त आयोजीत बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुनंदा माळी, सचिव माधुरी चव्हाण, लेखिका योजना मोहिते, संस्थेच्या अध्यक्षा कौशल्यादेवी शिंदे, सौ.राजलक्ष्मी शिंदे, नगरसेविका अनुराधा खडतरे, दादासो खडतरे, मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे, कामटे संघटनेचे सचिव अच्युत फुले, डॉ.महादेव जगताप सर, माजी उपनगराध्यक्षा सुमन घोंगडे, रमेश देवकर, सौ.दिप्ती यादव, सौ.प्रमिला जगदाळे, निलकंठ शिंदे , समीर मणेरी, अरूण कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक कै.वामनराव शिंदे व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पुढे बोलताना सुनिल बिडकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय कोणत्या ठिकाणी आहे आणि आपणास कोणत्या रस्त्यावरून जायचे आहे याचे भान ठेवून वागावे. आपण नुसते चालतच राहिलो तर ध्येय पाठीमागे गेल्याचे देखील आपल्या लक्षात येणार नाही. सर्वजण डॉक्टर, इंजिनीअर होण्यासाठी शिकू नका. स्वताच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना ओळखून आपले क्षेत्र निवडा. कारण जगात शिक्षणापेक्षा कलेला जास्त महत्व आहे. ज्याच्या अंगी कला आहे तो उच्च शिक्षित माणसांना देखील पाठीमागे पाडु शकतो. त्यामुळे नुसत्या पदव्या संपादन करण्यात वेळ आणि काळ वाया घालू नका. ठराविक ध्येय निश्र्चित करून वाटचाल करा.
शाळेमध्ये गणेशउत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन काळात घेण्यात आलेल्या 100 मीटर धावणे मुले, मुली, थाळी फेक, गोळा फेक, कबड्डी, हस्ताक्षर, नृत्य, ग्रुप डान्स, रंगभरण, कथा कथन अशा विविध स्पर्धांत यश संपादन केलेल्या मुलांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी विशेष बक्षीस म्हणून इयत्ता 9 वी मधील 100 टक्के हजेरी असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील बक्षीस देवून गौरविण्यात आले. तसेच इयत्ता 7 वी या वर्गास आदर्श वर्ग पुरस्कार देखील देण्यात आला.
सूत्रसंचालन सौ सुवर्णा इंगवले मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपड ेमॅडम यांनी मानले. यावेळी प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

100 मीटर धावणे लहान गट (मुले):- 1) अमित विजय उबाळे, 2) अजिंक्य बाबासाहेब उबाळे, 3) निखील साहेबराव उबाळे
100 मीटर धावणे (मुली) :- 1) सारिका तुकाराम माने, 2) स्वाती गुलाब जाधव, 3)  मनिषा दादासो येडगे
100 मीटर धावणे मोठा गट मुली :- 1) अनुजा पांडुरंग कोळेकर , 2) पार्वती खंडू रणदिवे, 3) प्रियांका महादेव रणदिवे
100 मीटर धावणे मोठा गट मुले :-  1) विशाल विठ्ठल जाधव, 2) अरमान फारूक शेख, 3) प्रकाश बुवा निंबाळकर
गोळा फेक मोठा गट मुली :- 1) महेविश फारूक शेख , 2) पार्वती खंडू रणदिवे, 3) गायत्री प्रमोद बोराडे
लहान गट मुले:- 1) शिंगु सुरेश शिंगाडे, 2) विकास सिद्धेश्र्वर शिंगाडे, 3) दिनेश दादासो जाधव
मोठा गट मुले :- 1) विशाल विठ्ठल जाधव, 2) प्रकाश बुवा निंबाळकर, 3) आरमान फारूक शेख
थाळी फेक मोठा गट मुले:- 1) विशाल विठ्ठल जाधव, 2) आरमान फारूक शेख, 3) प्रकाश बुवा निंबाळकर
थाळी फेक मोठा गट मुली :- 1) मेहविश फारुख शेख, 2) अनुजा पांडुरंग कोळेकर, 3) सोनाली जकाप्पा मासाळ
थाळी फेक लहान गट मुली :- 1) मोनाली विठ्ठल जाधव, 2) सारिका तुकाराम माने , 3) मनिषा दादासो येडगे
थाळी फेक लहान गट मुले :- 1) शिंगु सुरेश शिंगाडे, 2) अजय सतीष शिंगाडे, 3) मारुती मेटकरी
कबड्डी लहान गट :- इयत्ता सहावी मुले व मुली
मोठा गट:- इयत्ता आठवी व नववी 
हस्ताक्षर स्पर्धा लहान गट :- 1) अमृता संगमेश्र्वर साळुंखे, 2) आरती बाबा गावडे , 3) काजल कुमार दहीवडकर, 4) नम्रता ज्ञानेश्र्वर लेंडवे
गणेशउत्सव वैयक्तिक नृत्य स्पर्धा:- 1) चांदबी हजरत मुजावर, 2) मेहविश फारुख शेख, 3) शगुन शब्बीर मुलाणी
ग्रुप डान्स :- 1)  रिमिक्स- स्नेहा राजू साठे, मनिषा महादेव माने, 2) अशी चिक मोत्याची माळ- मीरा बिरुदेव बिचुकले, ज्योती गणेश बिचुकले
3) हे गणराया - दिपाली पवार, रसिका मेटकरी, नम्रता पाचंगे, प्रियांका कोळेकर.
रंगभरण स्पर्धा:- 1) नम्रता ज्ञानेश्र्वर लेंडवे, 2) अमृता संगमेश्र्वर साळुंखे, 3) तुषार तुकाराम माने, 4) पूनम आण्णा लवटे 
7 वी ते 8 वी :- 1) चांदबी हजरत मुजावर, 2) मनिषा महादेव माने , 3) शितल कुमार दहीवडकर, 4) आरती बाबा गावडे
8 वी ते 10 वी :- 1) मेहविश फारूक शेख, 2) मयुरी महादेव माने, 3) रुपाली अशोक जाधव, 4) माया तुकाराम माने
कथा कथन :- 1) अमृता संगमेश्र्वर साळुंखे, 2) मोनाली विठ्ठल जाधव, 3) दत्तात्रय रोहिदास निंबाळकर, 4) अमृता ज्ञानेश्र्वर लेंडवे
8 वी ते 10 वी:- 1) नंदिनी रवी टेके, 2) सोनाली जकाप्पा मासाळ, 3) श्र्वेता शिवाजी पवार, 4) शितल कुमार दहीवडकर
100 टक्के हजेरी इयत्ता 9 वी :- 1) प्रियांका महादेव रणदिवे, 2) सोनाली जकाप्पा मासाळ , 3) सोनाली भीमराव गडदे, 4) स्नेहल सुभाष गडदे, 5) रुपाली अशोक जाधव , 6) वैशाली वसंत निंबाळकर




=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments