पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 28 December 2017
निलेश चाळक बीड : शौचालयाचे अनुदान आताच पाहिजे असा हट्ट धरुन एकाने समूह समन्वयक सुहास तुकाराम जायभाये यांना मारहाण केली. ही घटना पंचायत समितीत बुधवारी सकाळी ११:३० वाजता घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुहास जायभाये हे बीड पंचायत समितीत स्वच्छ भारत मिशनमध्ये समूह समन्वयक पदावर कार्यरत आहेत. बुधवारी ते नित्याप्रमाणे कार्यालयीन कामकाज करत होते. ११:३० वाजता सय्यद नय्यूम मुकर्रम (रा. चिंचोली माळी ता. बीड) हा तेथे आला. त्याने शौचालय अनुदानासाठी आपल्या कुटुंबातील सहा व्यक्तींच्या नावे प्र्रस्ताव दाखल केले होते. नियमानुसार एका शौचालयासाठी एकाच व्यक्तीला अनुदान देता येते. त्यानुसार जायभाये यांनी एका व्यक्तीचे अनुदान मंजूरही केले होेते; उर्वरित पाच व्यक्तींचे अनुदान का देत नाही? यावररुन सय्यद नय्यूमने त्यांच्याशी हुज्जत घातली. शौचालय न बांधता अनुदान देता येत नाही असे सांगून जायभाये यांनी त्याची समजूत काढली; परंतु त्याने जायभाये यांना ‘मला काही सांगायचे नाही, अनुदान पाहिजेच’ असे म्हणत त्यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी पोटात मारहाण केली. यावेळी इतर कर्मचारी जायभाये यांच्या मदतीला धावले. त्यानंतर सय्यद नय्यूम तेथून निघून गेला. या घटनेने पंचायत समितीचे कामकाज काही वेळ विस्कळीत झाले होेते.
शिवाजीनगर पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ
सुहास जायभाये व इतर कर्मचारी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद नोंदविण्यास गेले. तेव्हा त्यांना तीन तास ताटकळत ठेवण्यात आले. त्यानंतर कंत्राटी कर्मचारी असल्याने शासकीय कामात अडथळा अशी फिर्याद नोंदविता येणार नाही असे सांगून पोलिसांनी टोलवाटोलवी केली. त्यानंतर कर्मचारी अधीक्षक जी. श्रीधर यांना भेटले. श्रीधर यांचे आदेश धडकताच शिवाजीनगर पोलिसांनी मारहाण व शासकीय कामात अडथळा या कलमान्वये गुन्हा नोंद करुन घेतला.

=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

0 Comments