पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 28 December 2017
पंढरपूर: दि.२७- ‘विज्ञान हे आजच्या समाज जीवनाला वरदान ठरत आहे. विज्ञानामुळेच देशाची व समाजाची प्रगती होत असते. तंत्रज्ञान काळाची गरज आहे. समाजाची उन्नती विज्ञानामुळेच होत असते. विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये मोठी संधी आहे. विज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी कशा प्रकारे उपकरणे तयार करू शकतात व त्यांचे स्वामित्व हक्क मिळवू शकतात. विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यानंतर वैज्ञानिक संकल्पना समृद्ध होतात’.असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जे. साळुंखे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रयत इन्स्पायर व विद्यार्थी विज्ञान’ या पाचदिवसीय महाविद्यालयीन शिबिरास सुरवात झाली. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. सीताराम गोसावी होते. यावेळी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाच्या रयत इन्स्पायर या प्रकल्पाचे प्रमुख मा. प्रशांत कोळसे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जे.एस. पाटील, प्रा. बी.जे. तोडकरी, प्रा. एन. एन. तंटक, डॉ. एम.टी. बचुटे, डॉ. एस.व्ही. पाटील, प्रा. डी. पी. माने प्रा. वाय.डी. अवताडे, प्रा. आर.एन. शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य गोसावी म्हणाले ‘अनिष्ट प्रथांवर विज्ञानाने मात करता येते. विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून समाजातील अनिष्ट प्रथा दूर
कराव्यात’.या शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, गणित, संख्याशास्त्र, कनादशास्त्र, इ.सी.एस. या विभागांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी उपयुक्त अशा प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले आहे. या शिबिरामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालय पंढरपूर, न्यू. इंग्लिश स्कूल भाळवणी, श्रीनाथ विद्यालय, बोरगाव, यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यलय, भोसे, श्री.नंद्केश्वर विद्यालय उपळाई व भैरवनाथ विद्यालय, अंकोली येथील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संखेने सहभागी झाले आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. नवनाथ पिसे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार मा. प्रशांत कोळसे यांनी मानले व सूत्रसंचालन प्रा. कु. आर.आर.हिलाल यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या रयत इन्स्पायर समितीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

0 Comments