मंजरथ गावाची सूत्रे उच्चविद्या विभूषित तरुणीच्या हाती...२५ वर्षीय ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या तरुणीने मंजरथच्या सरपंचपदी

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर Live 28 December 2017

निलेश चाळक बीड- जिल्ह्यातील मंजरथ या गावाने इतिहास घडवत गावाची सूत्रे उच्चविद्या विभूषित तरुणीच्या हाती सोपविली आहेत. दोन पुरुष उमेदवारांचा पराभव करत २५ वर्षीय ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या तरुणीने मंजरथच्या सरपंचपदी बाजी मारली आहे. ऋतुजा उच्च शिक्षित असून तिने ऐरोनॉटिकल सायन्स मध्ये एमटेकची पदवी प्राप्त केली आहे.मंजरथ या गावाचे सरपंच पद सर्वसाधारण वर्गासाठी राखीव होते. यामुळे या निवडणुकीत चुरस होती. असे असताना देखील निवडणूक लढवून ऋतुजाने या निवडणुकीत उमेदवारी दाखल केली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत तिने विजय अक्षरशः खेचून आणला. ग्रामस्थांनीही तरुणाईवर विश्वास दाखवत ऋतुजाच्या हाती गावाची सूत्रे दिली.

ऐरोनॉटिकल इंजिनिअर आहे ऋतुजा.. उच्चशिक्षित तरुणाईचा ग्रामीण राजकारणातील प्रवेश आशादायी ऋतुजा उच्च शिक्षित आहे. तिने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ऐरोनॉटिकल सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केले असून ती इंजिनिअर आहे. तिने ‘एम टेक’चे शिक्षणही पूर्ण केले आहे. अवघ्या पंचवीसाव्या वर्षी सरपंच झालेल्या ऋतुजाचे स्वप्न गावचा विकास करण्याचे आहे. तिच्या विजयाने गावात आनंदाचे वातावरण असून उच्चविद्याविभूषित तरुणाईचा ग्रामीण राजकारणातील प्रवेश आशादायी मानला जात आहे. ऋतुजाचे अनुकरण करून ग्रामीण भागातील उच्च शिक्षित तरुणाई राजकारणात उतरू लागली तर लवकरच खेड्यांचे रुपडे पालटलेले दिसेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.




=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments