लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 31 जानेवारी 2018
सोलापूर -अकलूज एसटी बसला अपघात आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अपघात सोलापूर-पंढरपूर मार्गावरील देगाव फाटयानजीक अपघात झाल्याने एस.टी. बसमधील 20 प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना घडली!
सोलापूर-अकलुज ही एस.टी. बस सोलापूरहून पंढरपूरकडे येत असताना पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली गावाजवळच्या देगाव फाट्यानजीक ही एसटीबस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. एस.टी. चालकाने समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करताना हा अपघात घडला असल्याचे समजते. या अपघातातील जखमींवर पंढरपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एसटी बस चालक समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करत असतानाच त्याच्या समोरुन एक मोटारसायकल आली. या मोटारसायकल स्वाराला वाचवण्याचा प्रयत्न एसटी बस चालक करत असताना ही बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात बसमधील सुमारे 20 प्रवाशी जखमी झाले आहेत. पैकी तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना सोलापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर उर्वरीत जखमींना पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची प्राथमीक माहिती मिळते. पंढरपूर तालुका पोलिस या अपघाताबाबत अधिक माहिती घेत आहेत.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments