लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 27 जानेवारी 2018
सोलापूर दि.27 :- गारमेंट पार्कसाठी सोलापुरात लवकरच 25 एकर जागा उपलब्ध करुन देणार, असे वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे जाहिर केले.
सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या युनिफॉर्म गारमेंट आणि होम टेक्स्टटाईल्स मॅन्युफॅक्चरर्स प्रदर्शनाचे आज उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय देशमुख, मफतलाल उद्योग समुहाचे अध्यक्ष ऋषीकेश मफतलाल, बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर अजयकुमार साहू, रामवल्लभ जाजू, एन.बी.रघुनाथ, निलेश शहा, राजू शहा, सतीश पवार आदी उपस्थित होते.
वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, ‘ सोलापुरातील विडी उद्योगाला फारसे भवितव्य नाही. सध्या या उद्योगातील कामगारांना रोजगार देण्यासाठी वस्त्रोद्योगाचा विकास होण्याची आवश्यकता आहे त्यासाठी सोलापुरात गारमेंट पार्क, टेक्स्टटाईल क्लस्टर, रेशीम पार्क अशा विविध योजना राबवण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. याचाच एक भाग म्हणून गारमेंट पार्कसाठी लवकरात लवकर 25 एकर जागा देण्याचा निर्णय घेतला जाईल’.
नरसिंग गिरजी गिरणीच्या जागेत टेक्सस्टाईल पार्क विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. पण त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी दूर करुन लवकरच त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे श्री. देशमुख यांनी सांगितले. सोलापूरचे ब्रँडिंग करण्यासाठी तीन दिवसाचे प्रदर्शन महत्वपूर्ण ठरेल. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सोलापूरच्या रेडिमेड उद्योगाला भरभराट येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री विजय देशमुख म्हणाले, सोलापूर एकेकाळी गिरणगाव म्हणून प्रसिध्द होते. आता गारमेंट हब आणि टेक्स्टाईल हब म्हणून प्रसिध्द व्हायला हवे. त्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल.
श्री. मफतलाल यांनी सोलापुरातील उद्योजकांशी सहकार्य करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.
यावेळी श्री. साहू, श्री. जाजू, निलेश शहा यांची भाषणे झाली. अमित जैन यांनी प्रास्ताविक केले. राजू शहा यांनी आभार मानले. तीन दिवस सुरु असणारे हे प्रदर्शन हॉटेल बालाजी सरोवर येथे आयोजित आहे. प्रदर्शनात 132 स्टॉल आहेत. युनिफॉर्मशी निगडीत सर्व व्यवस्था यांचा स्टॉलमध्ये समावेश आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments