लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 27 जानेवारी 2018
मंगळवेढा: - मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सन 2017-18 या वित्तीय वर्षात ग्रामविकास विभागाकडून मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती-सलगर खुर्द व महमदाबाद(शे.)- लक्ष्मी दहिवडी या दोन रस्त्यांसाठी 9 कोटी 13 लाख रूपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारतनाना भालके यांनी दिली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शिङ्गारशीनुसार काही रस्त्यांना निधी दिला जातो. या भागातील नागरिकांच्या रस्त्यांच्या अडचणीनुसार व ग्रामस्थांच्या मागणीनुसार या रस्त्यांची शिङ्गारस आमदार श्री भालके यांनी करून निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा केला होता. हुलजंती-सलगर खुर्द माकडचौक (टीआर5) 9.2 कि.मी. रस्त्यासाठी रू.626.72 लाख निधी तर महमदाबाद (शे.)- लक्ष्मी दहिवडी (टीआर10) या 5 कि.मी. रस्त्यासाठी रू.285.90 लाख निधी मंजूर होऊन या कामास प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. तसेच या कामाचा 5 वर्षाच्या विशेष नियमित देखभाल दुरूस्तीविशेष निधी मंजूर झाला आहे.
सदर रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळाला असल्यामुळे या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments