अशोक कामटे संघटनेच्या वतीने सांगोला आगारात प्रवाशी दिन उत्साहात साजरा

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 27 जानेवारी 2018

सांगोला/प्रतिनिधी : 
    शहीद अशोक कामटे सामाजिक संस्थेच्या वतीने प्रवाशी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सांगोला बसस्थानकात सकाळी विविध गांवाकडे जाणाऱ्या प्रवाशांचा गुलाबपुष्प व जिलेबी भरवून हा दिवस साजरा करण्यात आल्याबद्दल आगार व्यवस्थापक ए.एच.किरगत यांनी संस्थेला धन्यवाद दिले.
    आज प्रवाशी दिनाचे औचित्य साधून अशोक कामटे संघटनेच्या पदाधिकारी व सर्व सदस्यांनी सुमारे 100 हून अधिक प्रवाशांना गुलाबपुष्प व जिलेबीचे वाटप केले. यावेळी बोलताना आगार व्यवस्थापक किरगत म्हणाल्या, संस्थेच्या या उपक्रमामुळे प्रवाशांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्याचप्रमाणे एस.टी.चे चालक-वाहक यांनाही काम करताना नवीन उर्जा मिळणार आहे. प्रवाशी व एस.टी.महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संघटनेच्या या उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले. 
    यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष प्रा.निलकंठ शिंदे म्हणाले, आज प्रवाशी दिनाच्या निमित्ताने प्रवाशांच्या यशोच्छित सत्कार करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. एस.टी.चा प्रवास हा सुरक्षीत प्रवास आहे. म्हणूनच सुरक्षीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा या निमित्ताने संस्थेच्या वतीने सत्कार करणे व त्यांना मिठाई देणे हे आम्ही आमचे काम समजतो. यावेळी प्रवाशी वर्गातून बोलताना दादा चौगुले म्हणाले, आमचा अचानक सत्कार केल्याने व आम्हाला मिठाई दिल्याने आम्ही प्रवासी स्वत:ला भाग्यवान समजाते. या कार्यक्रमास एस.टी.चे टी.एस.शिकारे, वाहतूक निरिक्षक बाबासाहेब बनसोडे, वरिष्ठ लिपीक एस.पी.ढोले, लिपीक एस.एस.शेख, कामटे संघटनेचे अच्युतराव फुले, लक्ष्मीकांत लिगाडे, शहाजी पाटील, किरण माळी, संजय बाबर सह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments