लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2018
कन्या प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सांगोला/प्रतिनिधी : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित माध्यमिक कन्या प्रशालेत 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी, कवियत्री योजना मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण प्रशालेत करण्यात आले. यावेळी, संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे, सचिव प्रा.निलकंठ शिंदे, मुख्याध्यापिका सुवर्णाप्रभा घोरपडे, आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ध्वजारोहणास मानवंदना संभाजी बिले यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सुवर्णा इंगवले यांनी केले. यावेळी, विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिना निमित्त भाषणे झाली. कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटपाने करण्यात आली.
-------------------
अशोक कामटे संघटनेतर्फे ध्वजारोहण संपन्न
सांगोला/प्रतिनिधी : सांगोला येथील शहीद अशोक कामटे बहुउद्देशिय सामाजिक संघटनेच्या वतीने 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण करण्यात आले. स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयासमोर सचिव अच्युतराव फुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणास मानवंदना संस्थापक निलकंठ शिंदे यांनी दिली. यावेळी संघटनेचे ऍड.हर्षवर्धन चव्हाण, अजीत फुले, शहाजी पाटील, अभिषेक फुले, किरण माळी, आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments