पंढरीत आणखी एका वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले! एकाच दिवशी दोघा लाचखोरांवरील कारवाईमुळे भ्रष्ट व्यवस्था चव्हाट्यावर!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2018
एकाच दिवशी दोघा लाचखोरांवरील कारवाईमुळे 
भ्रष्ट व्यवस्था चव्हाट्यावर!

पंढरपूर शहरात आज सकाळी एका महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या एका सहाय्यक अभियंत्याला एक हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले असतानाच त्यापाठोपाठ आजच दुसर्‍या एका अभियंत्यालाही 15 हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले असल्याची माहिती हाती येतेय. एका दिवशी दोघा अभियंत्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातल्याने  विद्युत वितरण कंपनीच्या पंढरपूर विभागातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. सर्वसामान्य माणसांना वीज जोडणीसाठी व इतर कामांसाठी इथं लाच खाण्यासाठी लालचावलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर मात्र या दोन्ही घटनांमुळे वचक बसेल अशी अपेक्षा ग्रामीण भागातून व शहरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

पंढरपूर उपविभागातील सहाय्यक अभियंता जयप्रकाश कदम याला वीज कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी 1 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर आजच करकंब ग्रामीण विभागातील शाखा अभियंता संतोष सोनवणे याने एका कर्मचार्‍याचे निलंबन रद्द करुन कामावर घेण्यासाठी त्या कर्मचार्‍याकडून 15 हजार रुपयाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूरच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले आहे. याआधी यासाठी सदर अभियंत्याने 40 हजार रुपयाची लाच खाल्ल्याचे समजते. 

या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी कारवाई केल्याबाबत वीजवितरण कंपनीच्या ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments