पंढरीत विद्युत महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2018

पंढरीत विद्युत महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले 

आज पंढरपूर मध्ये एका पानपट्टी साठी विजजोडणी करीता 1000 रु. ची लाच घेताना जयप्रकाश महादेव कदम,वय, 57 वर्षे,  सहाय्यक अभियंता,(वर्ग- 2)  महावितरण शाखा पंढरपुर शहर.जि.सोलापूर
रा. प्लॉट नं 45,इसबावी,दुरदर्शन केंद्राजवळ, पंढरपुर जि, सोलापूर याला अॅन्टीकप्शन ब्युरो सोलापूर च्या पथकाने  विमल पान शॉप नवी पेठ कृष्ण हौद जवळ, पंढरपुर येथे रंगेहाथपकडले . दि.  29/01/2018 रोजी या सहाय्यक अभियंत्याविरूध्द सदर पानपट्टी चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आपली तक्रार नोंदवली होती.

तक्रारदार यांचे पान शॉप अतिक्रमण मध्ये काढण्यात आले आहे. त्यामधील विज जोडणी तोडून नविन ठिकाणी विज जोडणी करीता महावितरण शाखा पंढरपुर शहर कडे अर्ज केला आहे. नविन विज जोडणी देण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदाराकडे 1000/- रू लाचेची मागणी करून लाच रक्कम तक्रारदाराचे पान शॉपवर स्वत: स्विकारली असता रंगेहात पकडण्यात आले. अशी माहिती एसीबी चे डीवायएसपी देवकर यांनी दिली.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments