भरते पंढरीची वारी... आजार पंढरपूरकरांच्या घरी..! गरज वारकरी बांधवांनी स्वयंशिस्त बाळगण्याची..!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
भरते पंढरीची वारी... आजार पंढरपूरकरांच्या घरी..!
गरज वारकरी बांधवांनी स्वयंशिस्त बाळगण्याची..! 
 बेशिस्त अवैध पार्किंग... जागा मिळेल तिथं पडलेला कचरा... घाणीचं साम्राज्य!
 पंढरपूर LIVE 29 जानेवारी 2018
प्रत्येक वारीनंतर पंढरपूर शहरातील नागरिकांना विविध आजारांनी ग्रासलेलं असतं.. याला कारणीभुत ठरते ती वारकरी बांधवांनी कुठेही फेकलेलं अन्न, कचरा आणि जागा मिळेल तिथं केलेली लघुशंका व शौचा.. भुवैकुंठ पंढरी नगरीत आल्यावर या नगरीचं पावित्र्य जपणं व इथल्या स्वच्छतेच्या बाबतीत सजग राहण्यासाठी गरजय वारकरी बांधवांनी शिस्त बाळगण्याची..!
याबाबत पंढरीतील एका सजग नागरिकाने मांडलेली ही व्यथा...

श्री. क्षेत्र पंढरपूर हे श्री विठ्ठल आणि येथे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी प्रसिद्ध आहे. फार पूर्वीपासून संतांनी या भक्तांसाठी वारी चा मार्ग आखून दिला तो म्हणजे भक्ती, नाम, कीर्तन दिंडी भेटीगाठी असा प्रेमाचा होता.
पण वेळेनुसार या मार्गाचा आणि विठ्ठल भक्तांमध्ये बदल होत गेला. पूर्वी चालत बैलगाडीने येणारे वारकरी नंतर एसटी बस, रेल्वे ने येऊ लागले पण आता स्वतःचे वाहन घेऊन येऊ लागले आणि ज्या ठिकाणी मुक्काम केला असेल तेथे वाहने लावली जातात, पंढरपूर नगर पालिकेने यांच्या वाहनांची पार्किंग ची सुविधा केली असताना सुद्धा तेथे गाडी न लावता रात्री अपरात्री पोलिसांच्या नकळत अथवा चिरीमिरी देऊन गाडी शहरात घेऊन येतात आणि अवैध रित्या जागा दिसेल तिथे पार्किंग करतात.


या गाडयांमुळे आडोसा तयार होतो आणि मग वारकरी तिथे कचरा टाकणे अगदी दिवस ढवळ्या आसपास स्थानिकांची घरे आहेत याचा विचार न करता शौचास व लघुशंका करण्यासाठी बसतात. तसेच गरजेपेक्षा जास्त अन्न शिजवून शिल्लक अन्न हे राजरोस पणे गाडीच्या मागे फेकून देतात. हा सर्व कचरा ४ - ५ दिवस गाड्या असेपर्यंत तसाच राहतो कारण नगरपालिकेचे कचरा उचलणारे वाहन या अवैध पार्किंग मुळे तिथपर्यंत पोहचू शकत नाही आणि तोपर्यंत हा कचरा सडतो यामुळे अत्यंत घाणेरडा असा जीवघेणा दुर्गंध परिसरात पसरतो, जो वारी झाल्यावर सुद्धा परिसरात १५ ते २० दिवस तसाच राहतो ज्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते.  कि ज्यामध्ये लहान मुले वयोवृद्ध नागरिक पण असू शकतात.

"हि जर विठ्ठल भक्ती असेल तर खरंच तो परमेश्वर सर्वांवर कृपादृष्टी ठेवेल का."
पंढरपूर नगरपालिका अशापद्धतीने होणाऱ्या पार्किंग ला अथवा त्याला जबाबदार असणाऱ्या मठ, लॉज, भक्त निवास यांच्यावर कारवाई का करत नाही. स्थानिक नागरिकांचे आरोग्य नगरपालिकेसाठी महत्वाचे नाही का, हे सर्व स्थानिक नागरिकांनी अजून किती दिवस सहन करायचे आणि का?
-पांडुरंग बगाडे गांधीरोड






पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments