लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- स्वाभिमानी चर्मकार महासंघाच्या (सोलापूर जिल्हा युवक, पंढरपूर विभाग) कार्याध्यक्षपदी निलेश आगावणे यांची निवड करण्यात आली आहे. नुकतीच स्वाभिमानी चर्मकार महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांची बैठक पंढरपूरमध्ये झाली. यावेळी विविध नुतन पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष संजय बाबा शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रा. बंडु कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवड झालेले नुतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे; जिल्हा कोषाध्यक्षपदी मोहन बनसोडे, जिल्हा युवक सचिवपदी प्रशांत कबाडे, पंढरपूर शहर अध्यक्षपदी सचिन गवळी, शहर उपाध्यक्षपदी सुनिल आगावणे आणि किशोर कारंडे, शहर युवक अध्यक्षपदी अजय वाघमारे, तालुका सचिवपदी प्रा. शांतीनाथ शिंदे, तालुका युवक सचिवपदी किरण सराट यांची, तालुका कार्याध्यक्षपदी ज्योतीराम कांबळे, तालुका कोषाध्यक्षपदी योगेश कांबळे, तालुका युवक कार्याध्यक्षपदी अतुल खाडे, तालुका संघटकपदी सचिन वाघमारे, तालुका युवक संघटकपदी आकाश बनसोडे, तालुका उपाध्यक्षपदी देविदास शिंदे व भारतनाना घोडके, तालुका युवक उपाध्यक्षपदी संतोष बनसोडे, सोलापूर जिल्हा युवक सचिवपदी रावसाहेब लोंढे बेंबळे आदी नुतन पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी नुतन पदाधिकार्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वाभिमानी चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष निलेश आगावणे म्हणाले की, ‘‘माझी निवड करुन वरिष्ठांनी माझ्यावर खुप मोठी जबाबदारी टाकली आहे. निश्चितच येत्या काळात माझ्यावरची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून सर्व पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन कार्य करीन व चर्मकार समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी व अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीन.’’
जिल्हाध्यक्ष गणेश तुपसुंदर, जिल्हा निरीक्षक तानाजी जाधव, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख लक्ष्मण चाबुकस्वार, सोलापूर शहर युवक अध्यक्ष सर्पराज कांबळे, पंढरपूर तालुकाध्यक्ष दत्ता नाना बनसोडे, युवकअध्यक्ष किशोर शिंदे आदींसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments