लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 7 फेब्रुवारी 2018
पंढरपूरच्या मठात 75 हजार भाविकांना महाप्रसाद
गण गण गणात बोतेच्या गजरात सुमारे वीस हजार भाविकांच्या उपस्थितीत येथील श्री संत गजानन महाराज मठामध्ये 140 प्रगट दिन भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यानिमित्ताने सुमारे 75 हजाराहून अधिक भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आल्याचे स्थानिक व्यवस्थापक नंदकिशोर ठाकरे यांनी आज सांगितले.
प्रारंभी श्री च्या मूर्तीस पहाटे सव्वापाच वाजता काकड आरती, महामस्तकाभिषेक होऊन आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दरम्यान, मंदिरात सकाळी सात वाजल्यापासून महाप्रसाद वाटप सुरू करण्यात आले. त्यासाठी खास मांडव उभारून भारतीय बैठक व्यवस्था करण्यात आली.
सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गणेशबुवा लोखंडे महाराजांचे कीर्तन सुरू झाले. प्रगटदिनानिमित्तच्या कीर्तनानिमित्त याप्रसंगी श्री महाराजांच्या जीवनातील अनेक घटना, प्रसंग सोदाहण सांगत श्री. महाराजांच्या जीवनातील अऩेक प्रेरणादायी गोष्टी भाविकांना सांगितल्या. आजच्या बदलल्या काळात भक्ती ही कर्मवादाची, प्रयत्नवादाची करा. तुम्ही जर प्रयत्न केले तर महाराज निश्चित तुमच्या पाठीशी राहातील हे त्यांनी खूप छानपद्धतीने आपल्या कीर्तनात विषद केले.
कीर्तन सेवेनंतर निमंत्रित करण्यात आलेल्या 11 ब्रम्हवृदांच्या खड्या व सुस्पष्ट मत्रोच्चारात वैदीक मंत्रघोष सुरू करण्यात आला. बरोब्बर 12 वाजण्याच्या सुमारास प्रगटदिनोत्सवानिमित्त गुलाल उधळण्याचा कार्यक्रम झाला. यानंतर उपस्थित भाविकांना गण गण गणात बोतेचा जयघोष केला. त्यानंतर श्रीं ची आरती करण्यात आली. दरम्यान, आज प्रगटदिनानिमित्त श्रीं ना शुभ्र रांगाचे पागोटे, सोवळे व पूर्ण पोषाख परिधान करण्यात आला होता. त्यामुळे श्री चे रूप अधिकच प्रसन्न दिसून येत होते.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments