शासकीय कर्ज भरणा कसूर खातेदारांच्या गहाण संपत्तीचा 15 फेब्रुवारी रोजी लिलाव

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 7 फेब्रुवारी 2018

पंढरपूर दि.07 : शासनाकडून घेतलेल्या कर्ज रक्कमेची परतफेड करण्यास कसूर केलेल्या मंगळवेढातालुक्यातील खातेदारांच्या गहाण संपत्तीचा लिलाव 15 फेब्रुवारी  2018 रोजी तहसिल कार्यालय, मंगळवेढा येथे करण्यात येणार आहे. हा लिलाव महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 च्या कलमान्वये थकबाकीदारांना क्रमांक 1 व 2 ची नोटीस देऊन आणि कलम 180 अन्वये थकबाकीदारांना क्रमांक 3 ची नोटीस देऊन जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येत आहे. जाहीर लिलावातून प्राप्त होणाऱ्या रक्कमेतून आरआरसीची रक्कम शासन जमा करण्यात येणार असल्याचे तहसिलदार गणेश लव्हे यांनी कळविले आहे.
दिनांक 15 फेब्रुवारी 2018 रोजी लिलाव करण्यात येणा-या मालमत्तेत सौ वंदना भिमराव जावीर, रा.मरवडे/शिरनांदगी ता.मंगळवेढा  यांच्या गट.नं.12/2 मधील क्षेत्र 0.81 चौ.मी (वसूल पात्र रक्कम 46332/- रुपये तर दुय्यम निंबधक यांच्याकडील मुल्यांकन 563355/-)  या खातेदारानी शासनाकडून घेतलेले कर्ज परत करण्यास कसूर केली असल्याने त्यांच्या गहाण संपत्तीचा लिलाव करण्यात येत आहे. लिलावाच्या दिवशी खरेदीदार म्हणून जाहीर केलेल्या व्यक्तीस त्याने बोली केलेल्या रक्कमेच्या 25 टक्के अनामत रक्कम तात्काळ भरावी लागेल. लिलाव करण्यात येणाऱ्या मालमत्तेची संपूर्ण माहिती आवश्यक असल्यास तहसिल कार्यालय मंगळवेढा येथील अभिलेख विभागाशी संपर्क साधावा. तसेच लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीनी लिलावाच्या दिवशी सकाळी 11.00 वाजले पासून उपस्थित रहावे असे तहसिलदार गणेश लव्हे यांनी कळविले आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments