27 फेब्रुवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’ उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 7 फेब्रुवारी 2018

मुंबईदि. 7 : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी रोजी असणारा जन्मदिन हा राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
•          मराठी भाषा गौरव‍ दिन साजरा करताना त्या त्या विदयापीठाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावे.
•          विद्यापीठ क्षेत्रातील सर्व प्रकारच्या महाविदयालयांत मराठी भाषा व साहित्य मंडळ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करणेमराठी भाषेचा उगमविकाससमृध्दी आणि भवितव्य याबाबत विदयापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी लेख लिहून तो मराठी विकीपिडीयावर दयावा.
•          विद्यापीठांनी मराठी भाषा गौरव दिना निमित्ताने आयोजित केलेला कार्यक्रम शक्यतो ऐतिहासिक ठिकाणे,सांस्कृतिक सभागृहे येथे आयोजित करावा
•          मराठीची महती आणि माहितीसमाज जीवनातील स्थानमातृभाषेचे मानसशास्त्रीय आणि शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने महत्व याविषयावर विचारमंथनात्मक कार्यक्रम करावेत.
•          मराठीतल्या सकस साहित्याची माहितीपुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यभर ग्रंथप्रदर्शन,ग्रंथोत्सव आणि ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात यावे.
•          युनिकोडप्रणित मराठी आणि इन्स्क्रिप्ट मराठी कळफलक संबंधित विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणे.
•          समाजप्रसार माध्यमांतील मराठीमाहिती तंत्रज्ञान व मराठीमहाजालावरील मराठी या क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करणे.
•          कुसुमाग्रज आणि इतर थोर मराठी साहित्यिकांचे साहित्य यावर कार्यक्रममराठी वर्णमाला आणि बोलीभाषा यावरील कार्यक्रमांचे आयोजन करणे.
•          शब्दभांडार, नवीन पर्यायी शब्दनिर्मिती यावर स्पर्धाम्हणीवाक्यप्रचरप्राचीन शब्द याबाबत सादरीकरण,मराठी सुलेखनसुंदर मराठी हस्ताक्षर स्पर्धा असे विविध कार्यशाळांचे आयोजन करणे.
•          मराठी कविताप्रसिध्द उतारेमराठी भाषा विषयक घोषवाक्ये यांचे भित्तीचित्र प्रदर्शन किंवा स्पर्धा यांचे आयोजन करणे.
•          मोडी लिपीचे प्रशिक्षणव्याख्यान आणि परिसंवादाचे आयोजन करणे.
•          विकीपिडीयावर लेखन कसे करावे याबाबत कार्यशाळा घेणे.
सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक 201801221241393008 असा आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments