भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 7 फेब्रुवारी 2018
 मुंबईदि. 7 : राज्यातील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असून या योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेअसे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले आहे.
 या योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजननिवास व शैक्षणिक सुविधांसाठी विशेष अनुदान दिले जाते. यामध्ये मुंबई शहरमुंबई उपनगरठाणेनवी मुंबईपुणे, पिंपरी-चिंचवड,नागपूर या ठिकाणी उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजननिवास आणि निर्वाहासाठी एकूण 60 हजार रुपये देण्यात येणार आहे. तर इतर महसूल शहरातील, विभागीय शहरातील व उर्वरित "क" वर्ग महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 51 हजार रुपये देण्यात येणार आहेत. व उर्वरित ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 43 हजार रुपये या प्रमाणे रक्कम देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल.
            तरी या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी त्वरित शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्तसमाज कल्याण विभागयांच्याकडे अर्ज करावाअसे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्तसमाज कल्याण मुंबई शहर प्रशासकीय इमारत 4था मजलाआर.सी.चेंबूरकर मार्गचेंबूर मुंबई- 400071. दूरध्वनी क्रमांक. 022-25275073 या कार्यालयात संपर्क साधावा.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments